Pak vs Aus Test: Mitchell Starc ने पाक फलंदाजांना दाखवली रिव्हर्स स्विंगची जादू, कशी दांडी गुल झाली ते कळलंच नाही, पहा VIDEO

| Updated on: Mar 24, 2022 | 12:37 PM

Pak vs Aus Test: सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये लाहोर येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्सच्या गोलंदाजांची भन्नाट बॉलिंग पहायला मिळाली आहे.

Pak vs Aus Test: Mitchell Starc ने पाक फलंदाजांना दाखवली रिव्हर्स स्विंगची जादू, कशी दांडी गुल झाली ते कळलंच नाही, पहा VIDEO
पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया कसोटी, मिचेल स्टार्क
Image Credit source: pcb twitter
Follow us on

लाहोर: सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये लाहोर येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्सच्या गोलंदाजांची भन्नाट बॉलिंग पहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि नसीम शाहने (Naseem Shah) काही अप्रतिम चेंडूंवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. पाकिस्तानचा डाव सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) सुद्धा तशाच गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. रावळपिंडी आणि कराची प्रमाणे लाहोरच्या खेळपट्टीबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण या 22 यार्डच्या पीचवर मिचेल स्टार्कने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. मिचेल स्टार्कने लाहोर कसोटीच्या तिसऱ्यादिवशी शेवटच्या सत्रात मोहम्मद रिजवान आणि फवाद आलमला जबरदस्त रिव्हर्स स्विंगवर क्लीन बोल्ड केलं.

…आणि स्टार्कने खेळच बदलून टाकला
मिचेल स्टार्कने टाकलेले रिव्हर्स स्विंग इतका शानदार होता की, रिझवानसारखा जबरदस्त तंत्र असलेला फलंदाजही निरुत्तर झाला. स्टंम्पवरच्या बेल्स कधी उडाल्या ते रिझवानलाही समजलं नाही. फवाद आलमबरोबरही असंच झाल. लाहोर कसोटीच्या तिसऱ्यादिवशी पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये होता. त्यांच्या तीन बाद 248 धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कच्या हातात चेंडू सोपवला, त्यानंतर पूर्ण खेळच बदलला. स्टार्कने पाकिस्तानी डावाच्या 107 व्या षटकात कमालीची गोलंदाजी केली.

फवाद आणि रिझवान स्टार्कचे बळी

सर्वप्रथम मिचेल स्टार्कने फवाद आलमची विकेट काढली. स्टार्कने टाकलेला चेंडू हवेतच आतमध्ये आला, डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात फवादने विकेट गमावला. चेंडूने बॅट आणि पॅडच्या मधून जाऊन थेट यष्ट्यांचा वेध घेतला. स्टार्कचा रिव्हर्स स्विंग झालेला हा चेंडू खेळणं, फलंदाजांसाठी खूप कठीण होतं. स्टार्कचा डावातील हा पहिला विकेट होता.

निरुत्तर करणारा रिव्हर्स स्विंग 

रिझवानही हैराण

स्टार्क शांत बसला नाही. त्याने पुढच्याच षटकात कराची कसोटीत नाबाद शतक ठोकणाऱ्या मोहम्मद रिझवानची विकेट काढली. मोहम्मद रिझवानला स्टार्कने राऊंड द विकेट गोलंदाजी केली. रिझवानने स्टार्कच्या चेंडूवर बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अचानक रिव्हर्स स्विंग झाला.

उत्तम तंत्रही अशा चेंडूसमोर कमी पडतं 

रिझवानला वाटलं चेंडू आत येतोय. पण चेंडू बाहेर निघाला. चेंडूने थेट स्टंम्पसचा वेध घेतला. पीसीबीने स्टार्कच्या या दोन्ही चेंडूंचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. स्टार्कचे हे दोन्ही चेंडू खेळणं खरोखरच अशक्य होतं.