Liquor: दारू खरंच कमी करते ताण? कॉफी पिल्याने मूड होतो छान? तज्ज्ञांकडूनच समजून घ्या
Liquor or Coffee reduce Stress?: दारु पिल्याने ताण तणाव खरंच कमी होतो का आणि जास्त कॉफी पिल्याने नशेचा परिणाम, हँगओवर कमी होतो का? या दाव्यात किती तथ्य आहे, हे तज्ज्ञांकडून समजून घ्या. म्हणजे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील.

Alcohol Myths-Facts: दारूमुळे खरंच आलेला ताण आणि वाटणारा तणाव कमी होतो? दारुमुळे शरीरावर काय परिणाम होतो. कोणत्या भागाला सर्वाधिक नुकसान होते हे तुम्हाला माहिती आहे का? मद्यपींना असं वाटतं की दारू पिल्यानं सर्व टेन्शन गायब होतात. मस्त झोप लागते. जास्त जेवण जातं. तर काहींना वाटतं की दारू जास्त झाली आणि आपण जास्त कॉफी पिली तर दारुचा आपल्यावर परिणाम एकदम कमी होईल. हँगओव्हर उतरून जाईल, किती आहे या दाव्यांमध्ये तथ्य? तज्ज्ञांकडून समजून घा हा खास विषय, म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही.
खरंच तणाव पळून जातो?
रसायन शाखेतील तज्ज्ञ डॉ. जोसेफ जेनेज यांनी या पाच गोड गैरसमजावर मद्यपींना अलर्ट केले आहे. त्यांच्या मते दारु पिल्यावर सुरुवातीला आपल्याला थोडं हलकं वाटतं. ताण कमी झाल्यासारखं वाटतं. पण हा कायमस्वरुपी उपाय नाही. तर अस्थायी उपाय आहे. दारु पिल्यावरच आपल्याला असं वाटतं. पण ज्या गोष्टीचा ताण आणि तणाव आहे ती तशीच असते. दारू उतरल्यावर पुन्हा दारुड्यांना त्याचं टेन्शन, चिंता वाटतं. मग दारु पिण्याची सबब होते आणि पुढे ती सवय होते.
अनेक आजारांना आमंत्रण
दारु केवळ यकृतावर आणि पचन संस्थेवर परिणाम करते असे कुणाला वाटतं असेल तर तो भ्रम आहे. दारूचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होतो. रक्तदाबापासून ते हृद्यरोगापर्यंत आणि पचनसंस्थेपासून ते डोकेदुखीपर्यंत दारु अनेक रोगांना, आजारांना आमंत्रण देते. डॉ. जोसेफ यांच्या मते शरीर कमकुवत करण्यासाठी रोजची दारूची सवय पुरेशी आहे. दारु पिल्याने कर्करोग आणि इतर अनेक समस्या उद्भवतातत. शरीर सूजते.
पाणी मिसळल्याने दारू चढत नाही
हा गैरसमज तर एकदम प्रचलित आहे. अनेक जण दारू पिताना भरपूर खाल्ल आणि भरपूर पाणी पिलं तर दारू पाण्यात विरघळते आणि लघवीवाटे लागलीच बाहेर पडते असा चमत्कारीक दावा करतात. या दाव्यात काडीचाही अर्थ नसतो. अति दारु पिल्यावर हँगओव्हर होतोच. मग तुम्ही पाण्यात टाकून प्या की लिंबू टाकून प्या. दारु ही रक्तात शोषली जाते आणि ती मग संपूर्ण शरीरावर ताबा मिळवते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अतिरिक्त पाणी टाकून दारु पिल्यास त्यांनाही हँगओव्हरचा त्रास होतोच.
कॉफी पिल्याने दारुची नशा उतरते
सकाळी सकाळी दारुचा हँगओव्हर उतरत नसेल तर दही खा, लिंबू पाणी पी अथवा चार पाच कप कॉफी पी असे अनेक सल्ले देण्यात येतात. पण डॉ. जोसेफ यांच्या मते या भ्रामक गोष्टी आहे. जोपर्यंत शरीरातून दारुचे प्रमाण कमी होत नाही. तोपर्यंत तुम्ही काही पिले तरी हँगओव्हर कमी होणार नाही. तेव्हा पितानाच तुम्ही एक मर्यादा पाळली तर दुसऱ्या दिवशी काडीचाही त्रास होत नाही.
