PAK vs BAN : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानवर रडण्याची वेळ, झालं असं की…

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु आहे. पण पहिल्याच दिवशी पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. दुसऱ्या कसोटीत कमबॅक करायचा विचार असताना भलतंच घडलं. त्यामुळे बांगलादेश पाकिस्तान इतिहास रचणार असंच दिसतंय.

PAK vs BAN : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानवर रडण्याची वेळ, झालं असं की...
| Updated on: Aug 30, 2024 | 2:09 PM

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने चांगलाच घाम गाळला आहे. पण नियतीसमोर कोणाचं काहीच चालू शकत नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला धक्का बसला आहे. कारण पावसामुळे नाणेफेकीचा कौलही होऊ शकला नाही. पाऊस जाईल या आशेने सामनाधिकारी वाट पाहात होते. पण तसं काही झालं नाही. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. पहिला दिवस वाया गेल्याने पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. कारण फक्त चार दिवसांचा खेळ शिल्लक राहिला आहे. त्यातही दोन दिवस खेळ होईल की नाही याबाबत साशंकता आहे. हा सामना ड्रॉ झाला तर पाकिस्तानला मालिका गमवावी लागेल. तर पहिला कसोटी सामना विजयामुळे बांगलादेशचा संघ निश्चिंत आहे. उद्याही पावसाने हजेरी लावली तर खेळ होणं कठीण होईल. जर असं झालं तर बांगलादेश पाकिस्तानमध्ये इतिहास रचेल. तसेच पाकिस्तानात पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा मान मिळेल.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या सामन्यात दोन दिवस आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामन्यात खंड पडेल. रिपोर्टनुसार, सोमवार आणि मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. शनिवार आणि रविवारी वातावरण खेळण्यालायक राहील. म्हणजेच दुसऱ्या कसोटीत फक्त दोन दिवसांचा खेळ होईल, अशी शक्यता आहे. तेही मैदानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. जर वातावरण असंच राहिलं तर बांगलादेश कसोटी सामना जिंकेल.

पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 10 विकेट राखून पराभूत केलं होतं. पहिल्या डावात 448 धावा करत पाकिस्तानने डाव घोषित केला होता. त्यानंतर बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना पाकिस्तानला सर्वबाद फक्त 146 धावा करता आल्या. त्यामुळे विजयासाठी 30 धावांचं सोपं आव्हान मिळालं. बांगलादेशने हे आव्हान एकही गडी न गमवता पूर्ण केलं. दुसरा कसोटी सामना झाला नाही तर पाकिस्तानला कसोटी सामना गमवावा लागेल. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडेल.