AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : “मी संपूर्ण संघासोबत..”, भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीचं बांगलादेशला साकडं

World Cup 2023, IND vs BAN : क्रिकेट हा एक खेळ आहे. त्यात हार जीत होत राहाणार. पण अनेक जणांना पराभव जिव्हारी लागतो. त्यामुळे टोकाचं पाऊल देखील उचलतात. आतापर्यंत असे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता पाकिस्तानी अभिनेत्रींने पराभवाचा बदला घेण्याची बांगलादेशकडे मागणी केली आहे.

IND vs BAN : मी संपूर्ण संघासोबत.., भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीचं बांगलादेशला साकडं
IND vs BAN : पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घ्या! अभिनेत्री चवताळली आणि बांगलादेश संघासमोर ठेवली ऑफर
| Updated on: Oct 18, 2023 | 3:09 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा ही दर चार वर्षांनी असते. त्यामुळे जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रत्येक संघ जीव तोडून मेहनत घेत असतो. आतापर्यंत वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे 12 पर्व झाली आहेत आणि सध्या 13 वं पर्व सुरु आहे. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा, भारताने 2 वेळा, वेस्ट इंडिजने 2 वेळा, पाकिस्तानने 1 वेळा, श्रीलंकेने 1 वेळा आणि इंग्लंडने 1 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या जेतेपदाचा मानकरी कोण? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. दुसरीकडे, जेतेपदाचं सोडून पाकिस्तानचे चाहते एका सामन्याच्या निकालावर आडून बसले आहेत. साखळी फेरीत भारताने पराभूत केल्याने पाकिस्तानी क्रीडा चाहते चांगलेच संतापले आहेत. आता आपल्या पराभवाचा सूड इतर संघांना घेण्याची विनंती सुरु झाली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी हीने बांगलादेशला सोशल मीडियावर साकडं घातलं आहे. तसेच बांगलादेशने विजय मिळवल्यास एक ऑफर देखील दिली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 नोव्हेंबरला सामना होणार आहे. भारताने साखळी फेरीतील 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला 3 पैकी 1 सामना जिंकण्यात यश आलं आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने भारताची वाट अडवली होती हे देखील विसरून चालणार नाही.आता पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी हीने भारताला पराभूत करण्याची मागणी बांगलादेशकडे केली आहे.

सहर हीने ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढच्या सामन्यात आमचा सूड घेतील. जर त्यांची भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाली. तर मी ढाक्याला जाईल आणि बंगाली मुलांसोबत फिश डिनर डेट करेन.’ सहर हीने हे ट्वीट पाकिस्तानच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी केलं आहे. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 191 धावांवर बाद झाला होता. तर हे आव्हान भारताने 3 गडी बाद करत पूर्ण केलं होतं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उलटफेर

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तानने इंग्लंडला आणि नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. दुसरीकडे, भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला तर अव्वल स्थान कायम राहील. तसेच उपांत्य फेरीची वाट आणखी सोपी होईल.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...