पाकिस्तानी गोलंदाजाचं विराट कोहलीला ओपन चॅलेंज, शून्यावर बाद करण्याची घेतली प्रतिज्ञा

| Updated on: Jun 07, 2023 | 10:58 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होत नाहीत. मात्र आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात. आता आशिया कप आणि वनडे वर्ल्डकप समोर आहे. त्यात आता पाकिस्तानी गोलंदाजाने विराट कोहलीला ओपन चॅलेंज दिलं आहे.

1 / 6
पाकिस्तानचा 20 वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाहने त्याच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चांगलं नाव कमावलं आहे. 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा नसीम आता तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाचा कायमस्वरूपी सदस्य बनला आहे.

2 / 6
ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकणाऱ्या नसीमने आपले मुख्य लक्ष्य विराट कोहली असल्याचे जाहीर केले. एका मुलाखतीत पाकिस्तानी वेगवान गोलंदाज म्हणाला की, विराट कोहलीला शून्यावर बाद करणे हे त्याचे मोठे स्वप्न आहे.

3 / 6
भारताविरुद्ध खेळताना जीवाची बाजी लावणार असून विराट कोहलीची विकेट घेणे हे माझं लक्ष्य आहे.

4 / 6
विराट कोहलीला बाद करणे ही मोठी गोष्ट आहे. म्हणून त्याला शून्यावर बाद करणार असल्याचं नसीम शाह याने सांगितलं.

5 / 6
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. याशिवाय भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ भिडतील. त्यामुळे विराट कोहली आणि नसीम शाहचे यांचं द्वंद्व क्रीडाप्रेमींना पाहायला मिळेल.

6 / 6
नसीम शाहने पाकिस्तानकडून 15 कसोटी सामने खेळले आणि एकूण 42 बळी घेतले. त्याने 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23 आणि 19 टी-20 मध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत.