IND vs PAK सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, प्रमुख खेळाडू Asia Cup स्पर्धेतून बाहेर

| Updated on: Aug 20, 2022 | 4:46 PM

बहुचर्चित आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धा सुरु व्हायला आठवड्याभराचा कालावधी उरलेला असताना, पाकिस्तानी क्रिकेट संघाला एक मोठा झटका बसला आहे.

IND vs PAK सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, प्रमुख खेळाडू Asia Cup स्पर्धेतून बाहेर
pakistan team
Image Credit source: pcb
Follow us on

मुंबई: बहुचर्चित आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धा सुरु व्हायला आठवड्याभराचा कालावधी उरलेला असताना, पाकिस्तानी क्रिकेट संघाला एक मोठा झटका बसला आहे. टीमचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (shaheen shah afridi) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. तो आशिया कप स्पर्धेला मुकणार आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने (PCB) शनिवारी 20 ऑगस्टला एका अपेडट जारी करुन शाहीनच्या दुखापतीबद्दल ही माहिती दिली. गुडघे दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदीला एका महिन्यापेक्षा जास्त काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा आशिया कप मध्ये पहिला सामना 28 ऑगस्टला भारताविरुद्ध आहे.

4 ते 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला

शाहीन शाह आफ्रिदीच न खेळणं हा पाकिस्तानसाठी आशिया कप स्पर्धेमध्ये एक झटका आहे. डॉक्टरांनी त्याला 4 ते 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे नुकतेच स्कॅन आणि रिपोर्ट काढण्यात आले. डावखुरा वेगवान गोलंदाज आशिया कप आणि मायदेशात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. पण ऑक्टोबर मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 तिरंगी मालिकेत खेळताना दिसू शकतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप मध्येही दिसेल.

शाहीन धाडसी तरुण

गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना शाहीन शाह आफ्रिदीचा उजवा गुडघा फिल्डिंग करताना दुखावला होता. पीसीबीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीबुल्लाह सुमरु म्हणाले की, “मी शाहीन सोबत बोललोय, तो ही बातमी ऐकून निराश झाला. तो धाडसी तरुण आहे. तो देशाची सेवा करण्यासाठी जोरदार कमबॅक करेल” पुनर्वसन कार्यक्रमा दरम्यान शाहीन शाहने प्रगती केलीय. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. ऑक्टोबर महिन्यात तो स्पर्धात्मक क्रिकेट मध्ये पुनरागमन करेल.