Cheteshwar pujara: पुजारा काऊंटी गाजवतोय, सलग चौथी सेंच्युरी, पाकच्या आफ्रिदीला मारलेला अप्पर कट SIX एकदा पहाच, VIDEO

Cheteshwar pujara: दुसऱ्या डावात तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने शाहीन शाह आफ्रिदीला षटकार खेचला 1.1 ओव्हरमध्ये ससेक्सची स्थिती 6/2 अशी होती. संघ अडचणीत असताना चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला.

Cheteshwar pujara: पुजारा काऊंटी गाजवतोय, सलग चौथी सेंच्युरी, पाकच्या आफ्रिदीला मारलेला अप्पर कट SIX एकदा पहाच, VIDEO
cheteshwar pujara countyImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:43 AM

लंडन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar pujara) काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये अखेर सूर गवसला आहे. त्याने शनिवारी सलग चौथ शतक झळकावलं. पूजाराच्या या सेंच्युरीमध्ये 13 चौकार आणि दोन षटकार होते. मजबूत अशा मिडलसेक्स (Middlesex) संघाविरुद्ध अवघ्या 133 चेंडूत त्याने हे शतक झळकावलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी मिडलसेक्स संघाकडून खेळतो. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सुद्धा पुजाराने चांगली फटकेबाजी केली. चेतेश्वर पुजारा काऊंटीमधील ससेक्स संघाकडून खेळतोय. ससेक्सच्या (Sussex) दुसऱ्या डावात तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने शाहीन शाह आफ्रिदीला षटकार खेचला 1.1 ओव्हरमध्ये ससेक्सची स्थिती 6/2 अशी होती. संघ अडचणीत असताना चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. शाहीन शाह आफ्रिदीने सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवलं होतं.

तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होण्याआधी शतक

तिसऱ्या ओव्हरमध्ये आफ्रिदीला सिक्स मारल्यानंतर पुजाराने पाकिस्तानी गोलंदाजाला आणखी एक चौकार ठोकला. 67 चेंडूत त्याने 50 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने आक्रमक फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होण्याआधी त्याने शतक ठोकलं.

एकादिवसाचा खेळ शिल्लक

पुजारा 149 चेंडूत 125 धावांवर नाबाद आहे. टॉम क्लार्कसोबत तो फलंदाजी करतोय. पहिल्या इनिंगमध्ये ससेक्सचा डाव 392 धावात आटोपला होता. मिडलसेक्सने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या. फक्त आता एकादिवसाचा खेळ शिल्लक आहे. आज हा सामना ड्रॉ होऊ शकतो.

कोणाविरुद्ध किती डबल सेंच्युरी?

पूजारा त्याची चौथी काऊंटी मॅच खेळतोय. त्याने आधीच दोन द्विशतक ठोकली आहेत. मागच्या महिन्यात त्याने ससेक्ससाठी डेब्यु केला होता. त्या मॅचमध्ये पुजाराने 201 धावांची खेळी करताना डर्बीशायर विरुद्धची मॅड ड्रॉ करण्यात संघाला मदत केली होती. दुसऱ्या सामन्यात त्याने 109 आणि 12 धावांची खेळी केली. पण वॉरसेस्टशायर विरुद्ध पराभव टाळता आला नाही. तिसऱ्या सामन्यात ससेक्ससाठी त्याने पुन्हा द्विशतक झळकावलं. डरहॅम विरुद्ध त्याने 334 चेंडूत 203 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.