
CPL 2025 : पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याने चाहत्यांचा हिरमोड केला. त्याच्यावर चाहते नाराज आहेत. तो एक यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर आशिया कप टी 20 साठी काही भरवसा दाखवला नाही. या दुर्लक्षामुळे मोहम्मद रिझवान हा पहिल्यांदाच कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) उतरला. सीपीएलमधील सेंट किंट्स अँड नेविस पॅट्रियट्स या संघासोबत त्याने करार केला. पण हा करार सामना जिंकण्यासाठी होता की हारण्यासाठी हे काही समजले नाही. 24 ऑगस्ट रोजी एंटिगा अँड बारबुडा फाल्कंस या संघाविरोधात तरी त्याची कामगिरी अशीच काहीशी दिसली.
रिझवान संघाला फसवून बाहेर
सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने एंटिगा अँड बारबुडा फाल्कंस या संघाविरोधात अगोदर फलंदाजी केली. पण ते 20 षटकात 150 धावा पण करू शकले नाहीत. या संघाने 9 खेळाडू बाद केवळ 133 धाव करू शकले. सेंट किंट्स संघ कदाचित 150 धावांपेक्षा अधिकची खेळी करू शकला असता. पण मोहम्मद रिझवान ढेपाळला. त्यानं संघाला अडकवलं.
ना संघाला जिंकवू शकला ना PCB ला दिले खणखणीत उत्तर
CPL 2025 साठी सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्ससोबत रिझवानने कोट्यवधींचा करार केला होता. त्याचा हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात तो केवळ 3 धावा काढून बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात तरी तो जबरदस्त कामगिरी करेल असे वाटत होते. पण त्याने जी माती खायची ती खाल्लीच. त्याने सेंट किंट्सला विजय मिळवून दिलाच नाही तर दुसरीकडे पीसीबीला आशिया कपमध्ये निवड न केल्याबद्दल खणखणीत उत्तर दिले. रिझवान हा स्फोटक फलंदाजी करणार अशी जोरदार चर्चा होती. पण त्याने सर्वांचे दावे पोकळ असल्याचे सिद्ध केले.
रिझवानने किती केली कमाई
मोहम्मद रिझवान याने एंटीगा अँड बारबुडा फाल्कंसविरोधात 26 चेंडूचा सामना केला. त्यात त्याने केवळ 30 धावा ठोकल्या. सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने त्याच्यासोबत करार केला होता. एका वृत्तानुसार, त्याने भारतीय रुपयात 1.40 कोटी रुपयांचा करार केला होता. पाकिस्तानी चलनात त्याची किंमत 4.51 कोटी रुपये इतकी असल्याचे समोर येत आहे. चमकदार कामगिरीसाठी त्याला संघात घेतले होते. पण त्याने दोन सामन्यात संघासाठी कोणतीही मोठी कामगिरी बजावली नाही.