AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : ‘मी असतो तर लागलीच बदलला असता’- त्या नियमाबाबत का संतापला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील एका नियमावर जोरदार आक्षेप नोंदवला. त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. कोणता आहे तो नियम, ज्यामुळे सचिन तेंडुलकर आहे नाराज?

Sachin Tendulkar : 'मी असतो तर लागलीच बदलला असता'- त्या नियमाबाबत का संतापला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर
| Updated on: Aug 26, 2025 | 12:29 PM
Share

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या क्रिकेटमधील एका नियमाने नाराज झाला आहे. या नियमाने तशी क्रिकेटमध्ये मोठी क्रांती घडवली आहे. पण तेंडुलकरने या नियमात सुधारणा करण्याची वकील केली आहे. या नियमावर त्याने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्याने या नियमाचा खेळाडूंना फटका बसत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते, DRS नियमात बदल होणे गरजेचे आहे. या नियमात सुधारणा आवश्यक असल्याचे तेंडुलकर यांना वाटते.

अंपायर्स कॉलच्या नियमात व्हावा बदल

पंचाच्या निर्णयाविषयी तेंडुलकरने हे मत व्यक्त केले आहे. अंपायर्स कॉलसंबंधीत नियमात बदल व्हावा असे तो म्हणाला. सोशल मीडिया साईट रेडइटवर चाहत्यांशी त्याने संवाद साधला. यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रश्नांना बेधडक उत्तरं दिली. त्यावेळी एका चाहत्याने क्रिकेटसंबंधीत कोणत्या नियमात बदल होणे गरजेचे आहे असे त्याला विचारण्यात आले.

मी DRS नियमात अंपयार्स कॉलचा नियम बदलून टाकेल. मैदानावरील पंचाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यासाठीच तिसरा अंपायर क्रिकेटमध्ये दाखल झाला. त्यामुळे मैदानातील अंपायरच्या निर्णयाकडे पुन्हा वळण्याचे औचित्य तरी काय, गरज तरी काय असा सवाल त्याने केला. ज्याप्रकारे खेळाडूंचा वाईट काळ असतो, तसाच पंचांचाही वाईट काळ असतो. परिणामी तंत्रज्ञानाचा त्रुटी असेल तर ती कायम तशीच राहील असे मत तेंडुलकरने व्यक्त केले.

या नियमांविरोधात सचिन तेंडुलकर याने काही पहिल्यांदा विरोधी मत दिले नाही. त्याने यापूर्वी सुद्धा अंपायर कॉल नियमावर बोट ठेवले होते. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा याच्या सोबतच्या एका शोमध्ये सुद्धा या नियमावर त्याचे मत मांडले होते.

काय आहे म्हणणे?

तेंडुलकरने ब्रायन लारा याच्यासह शोवर हजेरी लावली होती. एक गोष्ट ज्यावर मी अजूनही सहमत नाही. तो म्हणजे ICC चा DRS नियम आहे. हा नियम गेल्या काही दिवसांपासून वापरात आहे. LBW विषयी मैदानावरील पंचाचा निर्णय (जर नॉट आऊट असेल तर) पलटवण्यासाठी चेंडूकडून स्टम्पचा 50 टक्क्यांपर्यंतचा भाग जोडणे आवश्यक आहे. त्यामुळेच अनेक खेळाडू मैदानातील पंचाविरोधात तिसऱ्या पंचाकडे धाव घेतात. तिसऱ्या पंचाकडे गेल्यावर तंत्रज्ञानाआधारे निर्णय घेऊ द्यावा. त्यात पुन्हा ढवळाढवळ करण्याची गरज नाही. टेनिसच्या नियमानुसार हा प्रकार असावे असे मत मास्टर ब्लास्टरने नोंदवले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.