
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचं लग्न जमल्यापासून ते थांबवण्यापर्यंत बरंच काही घडलं. भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर पलाशने स्मृती मंधानाच्या बोटात रिंग घालत लग्नाची मागणी केली. स्मृती मंधानाने त्याच्या या मागणीला होकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरु झाली. दोन्ही कुटुंबाकडून 23 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. लग्नाचं ठिकाण, मंडप, वाजंत्री आणि सर्वकाही ठरवलं गेलं. नातेवाईकांना पत्रिकांचं वाटप झालं. सांगली या दोघांचं लग्न सोहळा पार पडणार म्हणून मीडियाही उपस्थित होता. लग्नापूर्वी संगीत, हळदी आणि क्रिकेटचा सामनाही रंगला. 23 तारीख उजाडली आणि लग्न मुहूर्तही जवळ आला. पण तेव्हाच स्मृतीच्या वडिलांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. पलाश मुच्छलने हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असं त्याच्या आईने सांगितलं. त्यानंतर पलाशला अस्वस्थ वाटत असल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केलं होतं. पण आता दोघांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. आता पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे.
पलाशच्या चुलतीने इंस्टाग्राम खात्यावर हळदी आणि त्यानंतर झालेल्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हळदीच्या व्हिडीओत पलाश नाचत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत स्मृती आणि पलाश क्रिकेटचा सामना खेळत आहेत. या दोन्ही व्हिडीओवर युजर्संनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. अनेकांनी पलाश आणि स्मृतीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले आहे. एका युजर्सने लिहिले की, दोघेही लग्न बंधनात अडकणार ना? तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, स्मृती आणि पलाशला नेमकं काय झालं त्यावर स्पष्ट बोलायला सांगा. पलाशच्या चुलत भावाने पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केल्याने लग्नाची तारीख लवकरच काढली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्मृती मंधानाचे वडील आणि प्रियकर पलाश मुच्छल या दोघांना डिस्चार्ज मिळाला आहे. पण दोन्ही कुटुंबियांकडून या लग्नाबाबत अधिकृत असं काही सांगण्यात आलेलं नाही. असं असताना पलाशच्या आईचं वक्तव्य मात्र व्हायरल होत आहे. ‘स्मृती आणि पलाश दोघेही तणावात आहेत. पलाशने त्याच्या वधूसोबत घरी येण्याचे स्वप्न पाहिले होते. मी खास स्वागताची तयारी केली होती. सर्व काही ठीक होईल. लग्न लवकरच होईल.’, असं अमिता मुच्छल यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं.