बीसीसीआयने क्रिकेट नव्हे या खेळाडूंसाठी दिले 8.5 कोटी

BCCI gives 8.5 Crore to IOA: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय क्रीडा मंत्रालयाने सपोर्ट स्टाफच्या 140 सदस्यांनाही मान्यता दिली आहे, ज्यात क्रीडा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सहाय्यक कर्मचाऱ्यांचे 72 सदस्य शासकीय खर्चाने मंजूर करण्यात आले आहेत.

बीसीसीआयने क्रिकेट नव्हे या खेळाडूंसाठी दिले 8.5 कोटी
| Updated on: Jul 22, 2024 | 8:11 AM

BCCI gives 8.5 Crore to IOA, Paris Olympics 2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेटशिवाय दुसऱ्या खेळाडूंसाठी आपली तिजोरी उघडली आहे. टी 20 स्पर्धेतील विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना 125 कोटी दिल्यानंतर बीसीसीआयने आता 8.5 कोटी रुपये दिले आहे. ही रक्कम भारतीय ऑलम्पिक असोशिएशनला ही रक्कम दिली आहे. बीसीसीआयला भारतीय ऑलिम्पिकपटूंकडून पदाची अपेक्षा आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024 या आठवड्यात सुरु होत आहे. त्यासाठी भारताचे 117 खेळाडूंचे पथक गेले आहे.

बीसीसीआयची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, BCCI ने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देईल. आम्ही या मोहिमेसाठी भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनला 8.5 कोटी रुपये देत आहोत.

जून महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकला होता. त्यावेळी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट टीम आणि सपोर्टिंग स्टाफला 125 कोटी दिले होते. भारतीय संघातील 15 खेळाडू आणि तत्कालीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 5-5 कोटी दिले होते.

भारताचे 117 खेळाडूंचे पथक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. याशिवाय क्रीडा मंत्रालयाने सपोर्ट स्टाफच्या 140 सदस्यांनाही मान्यता दिली आहे, ज्यात क्रीडा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सहाय्यक कर्मचाऱ्यांचे 72 सदस्य शासकीय खर्चाने मंजूर करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील 119 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी भारताला 7 पदके मिळाली होती. यामध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाचा वेध घेतला होता.

ऑलिम्पिक खेळाडूंच्या यादीत 29 (11 महिला आणि 18 पुरुष) खेळाडू एथलेटिक्स आहे. त्यांच्यानंतर नेमबाजी (21) आणि हॉकी (19) खेळाडू आहेत. टेबल टेनिसमध्ये भारताचे आठ खेळाडू सहभागी होतील, तर दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूसह सात खेळाडू बॅडमिंटनमध्ये सहभागी होतील. कुस्ती (6), तिरंदाजी (6) आणि बॉक्सिंग (6) मध्ये प्रत्येकी 6 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये आपले सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. तसेच गोल्फ (4), टेनिस (3), पोहणे (2), सेलिंग (2) बरोबर घोडेस्वारी, ज्युदो, रोइंग आणि वेट लिफ्टिंगमध्ये प्रत्येकी एक, एक खेळाडू सहभागी होईल.