
दुबई : कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत आयपीएल (IPL 2021) ही युएई (UAE) होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ हळू हळू युएईला पोहोचत आहेत. मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू देखील युएईत पोहोचले आहेत. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून आता खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. सरावादरम्यान मजा मस्ती करत क्रिकेटची सराव केला जात आहे.
दरम्यान सराव सामन्यादरम्यान मुंबईचा युवा फलंदाज इशान किशन एका नो बॉलवर धाव घेण्यास सहखेळा़डूना नकार देत होता. याचे कारण त्याला पुढील चेंडूवर फ्रि हिट खेळायची होती. पण मुंबई संघाचा माजी खेळाडू पार्थिवही सरावासाठी संघासोबत असून त्याने इशानला दबरदस्ती रन घ्यायला लावला. या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सच्या संघाने पाण्यामध्ये उतरत वॉलीबॉल खेळाचा आनंद लुटला. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर हा वॉलीबॉल खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये इशान किशन, पीयूष चावला, आदित्य तारेसह धवन कुलकर्णी आणि इतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिसून येत होते. आयपीएल 2021 च्या उर्वरीत 31 सामन्यांमध्ये पहिलाच सामना मुंबई विरुद्ध चेन्नई असल्याने क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इतर बातम्या
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’
(Parthiv patel Forced ishan kishan to take single run at Mumbai Indians practice session)