
आयपीएलच्या 17 व्या हंगमातील पहिल्या डबल हेडरचं आयोजन हे आज शनिवारी 23 मार्च रोजी करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील दुसरा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. शिखर धवन पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत अपघातानंतर तब्बल 453 दिवसांनी कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामना खेळण्यासाठी तयार झाले आहेत.
ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व सांभाळणार आहे. पंतने दिल्लीच्या सलामीच्या सामन्याआधी नेट्समध्ये बॅटिंगचा जोरदार सराव केला. तसेच विकेटकीपिंगचा सराव केला. पंतने अपघातानंतर आपण फटकेबाजी करण्यासाठी तयार असल्याचंही या व्हीडिओतून जाहीर केलंय. पंतचा हा व्हीडिओ व्हायरल झालाय. तसेच पंतला अनेक महिन्यांनी पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
ऋषभ पंतने आयपीएलमधील अखेरचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध 15 व्या हंगामात 21 मे 2022 रोजी खेळला होता. तर अखेरचा क्रिेकट सामना हा 22 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध खेळला होता. त्यानंतर पंतचा अपघात झाला. पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पंत अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर सरावाला सुरुवात केली आणि अखेर तो आता सज्ज झाला आहे.
पंतच्या कमबॅकआधी दिल्ली कॅपिट्ल्सने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक खास व्हीडिओ पोस्ट केला आहे. पंतने कमबॅकबाबत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. पंत काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
“वॉकिंगपासून जॉगिंगला सुरुवात केली. जॉगिंगनंतर रनिंगला केली. त्यानंतर बॅटिंग केली. तो नेमका दिवस मला लक्षात नाही, मात्र तो क्षण मला लक्षात आहे. ती भावना तुम्ही शब्दात मांडू शकत नाही. तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता. असंही वाटलं नाही की पहिल्यांदा खेळलोय किंवा असंही वाटलं नाही आधीपासून खेळतोय. ती वेगळीच ताकद आणि वेगळीच भावना होती.”, अशा शब्दात पंतने शस्त्रक्रियेनंतर कसं कमॅबक केलं हे सांगितलं.
“चिंता आहे तसेच उत्सूकही आहे, खूप काय काय वाटतंय. त्यामुळे फार विचार करण्याची गरज नाही. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा. धोनी भाईचा एक डायलॉग आहे. पडत्या विषयावर लक्ष द्या, हा एक प्रवासाचा भाग आहे. त्या प्रवासाचाही आनंद घ्यायचाय. सराव करताय तर बॅट कशी आहे? विकेटकीपींग करताय तर बॉल हातात कसा येतोय? या लहान लहान गोष्टींचा आनंद घेतला तर जीवनात सकरात्मकता वाढेल”, असं पंतने म्हटलं.
ऋषभ पंत भावूक
𝐑𝐚𝐛 𝐑𝐚𝐤𝐡𝐚 𝐑𝐢𝐬𝐡𝐚𝐛𝐡 🫶
There are comeback stories and then there is a Rishabh Pant comeback story ❤️
Audio Courtesy – JioCinema#YehHaiNayiDilli #IPL2024 #PBKSvDC | @RishabhPant17 pic.twitter.com/MUiUD3g63u
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 23, 2024
दिल्ली कॅपिटल्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), शाई होप (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, इशांत शर्मा, रिकी भुई, झाय रिचर्डसन, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, यश धुल, विकी ओस्तवाल, अभिषेक पोरेल आणि स्वस्तिक चिकारा.
पंजाब किंग्स टीम | शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, सिकंदर रझा, सॅम करन, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, शिवम सिंग, ख्रिस वोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, रिली रोसोव, हरप्रीत सिंग भाटिया, ऋषी धवन, शशांक सिंग, तनय त्यागराजन, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, विद्वथ कवेरप्पा, प्रिन्स चौधरी आणि विश्वनाथ सिंग.