
आयपीएलच्या 18 व्या मोसमात आता ट्रॉफीसाठी 4 संघ आमनेसामने आहेत. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मात्र प्लेऑफमधील 4 संघात टॉप 2 स्पॉटसाठी जोरदार चुरस आहे. या हंगामातील 69 व्या सामन्यात आज 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोघांपैकी पराभूत होणारा संघ बाहेर होईल. पराभूत संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची दुहेरी संधी मिळणार नाही. तसेच जिंकणारा संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचेल. तसेच विजयी संघाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी दोन वेळा संधी मिळेल. वरील समीकरण हे टॉप 2 च्या हिशोबाने (Qualifier 1) आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील कोणता संघ विजयी होणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ताज्या आकडेवारीनुसार,मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्य चौथ्या स्थानी आहे. मुंबईचे 13 सामन्यांनंतर 16 पॉइंट्स आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा 1.292 असा आहे. तर पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानी आहे. पंजाबचे 13 सामन्यानंतर 17 गुण आहेत. पीबीकेएसचा नेट रनरेट हा 0.327 असा आहे. चेन्नई सुपर किंग्सने 25 मे रोजी गुजरात टायटन्स टीमवर मात केली. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. चेन्नई विरूद्धच्या पराभवानंतरही गुजरात पहिल्या स्थानी कायम आहे. मात्र मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमधील चित्र बदलणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पंजाबपैकी कोणता संघ याचा फायदा घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गुजरातचे 14 सामन्यानंतर 18 पॉइंट्स आहेत. तर गुजरातचा नेट रनरेट 0.602 असा होता जो पराभवानंतर 0.254 असा झाला आहे. त्यामुळे मुंबई-पंजाब सामन्यानील विजेता संघ गुजरातला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचेल. तर पराभूत संघाचं टॉप 2 मध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग होणार.
मुंबई पंजाब विरुद्ध जिंकली तर 14 सामन्यांनंतर 18 पॉइंट्स होतील. त्यामुळे मुंबई नेट रनरेटच्या जोरावर गुजरातला मागे टाकेल. त्यामुळे गुजरातची दुसऱ्या स्थानी घसरण होईल. तर पंजाब चौथ्या स्थानी घसरेल.
तसेच पंजाबने मुंबईवर मात केल्यास त्यांचे 14 सामन्यानंतर 19 गुण होतील. पंजाब यासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचेल. मुंबई या पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये आहे त्याच चौथ्या स्थानी कायम राहिल. मात्र मुंबई क्वालिफायर 1 च्या स्पर्धेतून आऊट होईल.