GT vs CSK : कॅप्टन धोनीचा शेवटच्या सामन्यात जीटीला झटका, गुजरातचा 83 धावांनी धुव्वा, मुंबई-पंजाबला फायदा
Gujarat Titans vs Chennai Super Kings Match Result : आयपीएलच्या 18 व्या मोसमात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी असणाऱ्या गुजरात टायटन्सला 10 व्या स्थानी असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने83 धावांनी पराभूत केलंय. गुजरातला शुबमन गिल याच्या नेतृत्वात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील मोहिमेचा अप्रतिम शेवट केला आहे. सीएसकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या 67 व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सचा 83 धावांनी धुव्वा उडवत चौथा विजय मिळवला. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 231 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातचा डाव 18.3 ओव्हरमध्ये 147 रन्सवर आटोपला. चेन्नईने यासह हा सामना जिंकला. तर प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेल्या आणि टॉप 2 च्या शर्यतीत असलेल्या गुजरातला मोठा झटका लागला. गुजरातच्या या पराभवामुळे आता पंजाब किंग्ससह मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना टॉप 2 मध्ये पोहचण्याची संधी आहे. सोमवारी 26 मे रोजी पंजाब विरुद्ध मुंबई सामना होणार आहे.
चेन्नईच्या गोलंदाजांनी 231 या विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला सुरुवातीपासूनच झटके दिले. गुजरातला ठराविक अंतराने झटके दिल्याने त्यांच्या एकाही खेळाडूला डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मोठी खेळी करणं शक्य झालं नाही. कॅप्टन शुबमन गिल 13 आणि जोस बटलर याने 5 धावा केल्या. तर शेरफेन रुदरफोर्ड याला भोपळाही फोडता आला नाही. गुजरातचे टॉप 3 फलंदाज ढेर झाले. त्यामुळे गुजरातची स्थिती 3 आऊट 30 झाली. मात्र मॅचविनर साई सुदर्शन मैदानात असल्याने गुजरातला दिलासा होता.
साई आणि शाहरुख खान या दोघांनी गुजरातचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीकडून गुजरातला आशा होता. मात्र रवींद्र जडेजा याने ही चौथ्या विकेटसाठी झालेली 55 धावांची भागादारी फोडली. जडेजाने शाहरुख खान याला 19 धावांवर आऊट केलं. साईकडून आशा होत्या. मात्र साई आऊट होताच सर्व आशा संपल्या. साईने 41 रन्स केल्या. त्यानंतर एक एक करुन गुजरातचे फलंदाज आऊट झाले.
चेन्नईचा कडक विजय
The 5⃣-time champs sign off from #TATAIPL 2025 with a convincing win 💛#CSK register a HUGE 83-run win over #GT 👏
Updates ▶ https://t.co/P6Px72jm7j#GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ey9uNT3IqP
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
राशिद खान याने 12 धावा केल्या. गेराल्ड कोएत्झी 5 रन्सवर माघारी परतला. राहुल तेवतिया 14 रन्सवर आऊट झाला. अर्शद खान याने 20 धावा करुन पराभवातील अंतर कमी केलं. तर आर साई किशोर आऊट होताच गुजरातचा डाव आटोपला आणि चेन्नईने या हंगामातील चौथा विजय मिळवला. चेन्नईसाठी अंशुल कंबोज आणि नूर अहमद या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स मिळवल्या. रवींद्र जडेजाने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखला. तर खलील अहमद आणि मथीशा पथीराणा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
