
मुंबई : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा घेतलेला निर्णय रोहित शर्माच्या अंगलट आल्यासारखं दिसत आहे. पंजाब संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावत 214 धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 215 धावाचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 धावा केल्या. जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली.
मुंबईने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर पंजाबचा कर्णधार शिखर धवन याला पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली होती. प्रभसिमरन फार काही जास्त टिकला नाही. 9 धावा करून तो माघारी परतला, त्यानंतर शॉर्ट 27 धावा आणि धवन 30 धावा करत बाद झाले.
दोघेही बाद झाल्यावर त्यानंतर आलेल्या लियाम लिव्हिंगस्टन आणि जितेश शर्मा यांनी मुंबईच्या बॉलिंगचा क्लास घेतला. लिव्हिंगस्टन याने 42 चेंडूत 82 धावांची खेळी केली, यामध्ये त्याने 4 षटकार आणि 7 चौकार मारले. यामधील 3 सिक्सरचा मुंबईचा मेन बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चर यालातर सलग 3 सिक्स मारले. त्याच्यासह दुसऱ्या बाजूने 27 चेंडूत 49 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकार मारले, अवघ्या 1 धाव त्याचं अर्धशतक करायला कमी पडली.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान