
टीम इंडियाने आतापर्यंत दिव्यांग क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत विक्रांत केणी याच्या नेतृत्वाच धमाका केला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील 5 पैकी सलग 4 सामने जिंकले. टीम इंडियाने यासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि पुन्हा पाकिस्तानला पराभूत केलं आणि विजयी चौकार लगावलं. मात्र शनिवारी 18 जानेवारीला इंग्लंडने टीम इंडियावर 4 धावांनी मात केली आणि पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाने इंग्लंडचा 14 जानेवारीला 29 धावांनी पराभूत केलं होतं. इंग्लंडने भारताला पराभूत करत हिशोब क्लिअर केला.
आता टीम इंडिया या स्पर्धेतील साखळी फेरीतील आपला सहावा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. टीम इंडियाने 15 जानेवारीला श्रीलंकेवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता श्रीलंकेकडे या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. आता श्रीलंका विजयी होते की टीम इंडिया या स्पर्धेत श्रीलंकेवर दुसऱ्यांदा मात करते? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना रविवारी 19 जानेवारीला होणार आहे.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना फॅनकोडद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहायला मिळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र