
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. लखनौ आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना असणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या कर्णधारपदाची धुरा आहे. गुजरातची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर गुजरातने सलग 4 विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौने गेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच लखनौने गेली दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे लखनौला गुजरातवर मात करत विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरात विजयी पंचसाठी सज्ज आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकतं? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनौ विरुद्ध गुजरात सामना शनिवारी 12 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
लखनौ विरुद्ध गुजरात सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे आयोजित करण्यात आला आहे.
लखनौ विरुद्ध गुजरात सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
लखनौ विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहत येईल.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.