IND vs SL: दुसऱ्या कसोटीत जयस्वाल-फर्नांडोनंतर आणखी एका खेळाडूवर कारवाई, आयसीसीकडून शिक्षा

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात खेळाडूंचं गैरवर्तन चर्चेत आलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांना शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता एक खेळाडूवर आयसीसीने कारवाईचा बडगा उचलला आहे.

IND vs SL: दुसऱ्या कसोटीत जयस्वाल-फर्नांडोनंतर आणखी एका खेळाडूवर कारवाई, आयसीसीकडून शिक्षा
IND vs SL: दुसऱ्या कसोटीत जयस्वाल-फर्नांडोनंतर आणखी एका खेळाडूवर कारवाई, आयसीसीकडून शिक्षा
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Aug 25, 2026 | 4:30 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या कसोटी सामन्यात काही वाद पाहायला मिळाले. त्यामुळे हा कसोटी सामना सुरू असतानाच चर्चेत आला आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन्ही खेळाडूंच्या सामना मानधनातून दंड आकारला होता. त्यानंतर आणखी एक श्रीलंकन खेळाडू आयसीसीच्या रडारवर आला आहे. आयसीसीने प्रभात जयसूर्याच्या एका कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रभात जयसूर्याने आयसीसीच्या प्लेयर आणि प्लेयर सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. त्याने आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.2 चं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रिकेट साहित्य किंवा कपडे, ग्राउंडमधील साहित्य किंवा फिटिंगचा चुकीचा वापर केल्या संदर्भात आहे.

प्रभात जयसूर्याच्या डिसिप्लिनरी रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. त्याचं झालं असं की, दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारतीय संघाने डाव घोषित केला. श्रीलंकेची अवघी एक धाव असताना लहिरू उदारा बाद होत तंबूत परतला. त्यामुळे नाईट वॉचमन म्हणून प्रभात जयसूर्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली. कारण शेवटच्या टप्प्यात महत्त्वाच्या खेळाडूंना वाचवण्यासाठी ही खेळी केली जाते. पण प्रभात जयसूर्या काही खास करू शकला नाही आणि बाद झाला. अवघ्या 2 धावांवर असताना मानव सुथारने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

प्रभाव जयसूर्याच्या या विकेटसह दिवसाचा खेळ संपला . पण प्रभात जयसूर्या मैदानाबाहेर जात असताना रागाच्या भरात त्याने बाउंड्री वेजजवर बॅटने मारलं. खरं तर ही कृती नियमानुसार चुकीची आहे. त्यामुळे आयसीसीने या कृतीची गंभीर दखल घेतल त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. इतकंच काय तर प्रभात जयसूर्याने आपली चूक कबूल केली आहे. त्यामुळे सुनावणीची गरजच भासली नाही.

Follow Us