पंजाब किंग्ससाठी सर्वात मोठी खूश खबर, क्वालिफायर-2 पूर्वीच बळ वाढलं, असं काय घडलं? मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं

आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येत आहेत. दुखापतीनंतर बरा झालेल्या युजवेंद्र चहलच्या संभाव्य पुनरागमनामुळे पंजाब किंग्सला मोठा बळकट मिळाला आहे. चहलच्या अनुपस्थितीमुळे पंजाब किंग्सला क्वालिफायर 1 मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या महत्त्वाच्या सामन्यात चहलचा समावेश पंजाब किंग्ससाठी खेळाच्या परिणामावर मोठे परिणाम करू शकतो.

पंजाब किंग्ससाठी सर्वात मोठी खूश खबर, क्वालिफायर-2 पूर्वीच बळ वाढलं, असं काय घडलं? मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं
Punjab IPL team
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 01, 2025 | 2:33 PM

आयपीएल 2025मध्ये आता केवळ दोनच सामने बाकी आहेत. आज 1 जून 2025 रोजी क्वालिफायर-2 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सची भिडत होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हा महत्त्वाचा सामना सुरू होण्यापूर्वीच पंजाब किंग्ससाठी सर्वात मोठी खूश खबर आहे. पंजाब किंग्सच्या एका स्टार खेळाडूचं संघात पुनरागमन होणार आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू संघातून बाहेर होता. आता बरा झाल्याने त्याला संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंजाब किंग्सचं बळ वाढलं आहे. तर मुंबई इंडियन्ससाठी मात्र ही बातमी टेन्शन देणारी आहे.

फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या या मॅचमध्ये पंजाब किंग्सच्या फॅन्ससाठी खूश खबर आहे. टीमचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची संघात पुनरागमनाची शक्यता वाढली आहे. चहलला मनगटाला दुखापत झाली होती. त्यातून तो बरा झाला आहे. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याचा समावेश होऊ शकतो. युजवेंद्र चहला आयपीएल 2025च्या लीग स्टेजच्या शेवटच्या दोन सामन्यात मनगटाला दुखापत झाल्याने त्याला सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे तो क्वालिफायर-1मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरोधात खेळू शकला नव्हता. त्याचा परिणाम म्हणजे पंजाब किंग्सच्या हातून हा सामना गेला होता. पंजाब किंग्सला पराभूत व्हावं लागलं होतं. चहल नसल्याने संघाची बॉलिंग ऑर्डर कमकुवत असल्याचं दिसून आलं होतं. खासकरून स्पिनच्या बाबत संघ कमकुवत झाला होता. आता चहल दुखापतीतून बाहेर पडला असल्याचं सांगितलं जातं. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रॅक्टिस सेशनवेळी तो गोलंदाजी करतानाही दिसला. त्यामुळेच चहल पुन्हा संघात परतण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वात यशस्वी फलंदाज

युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने या सीजनमध्ये पंजाब किंग्ससाठी 12 सामन्यात 14 बळी गेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 9.56 आहे. चहलने या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात हॅट्रीकही केली होती. पंजाब किंग्सने त्याला 2025च्या लिलावात 18 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तो टीमसाठी मिडल ओव्हरमध्ये बळी घेण्यास महत्त्वाची भूमिका निभावत आहे. त्यामुळेच त्याचं पुनरागमन झाल्यास क्वालिफायर-2मध्ये पंजाब किंग्स संघ अत्यंत बळकट होणार आहे.

विनर होण्याची प्रतिक्षा

पंजाब किंग्सने लीग स्टेजमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. 14 सामन्यांपैकी 9 सामने पंजाब किंग्सने जिंकले आहेत. पॉइंट्स टेबलमध्येही टॉपचं स्थान मिळवलं आहे. दरम्यान क्वालिफायर 1मध्ये आरसीबीच्या विरोधात पराभूत झाल्यानंतर क्वालिफायर 2मध्ये पंजाब किंग्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळावं लागणार आहे. अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या सीजनपासूनच पंजाब किंग्स आयपीएलमध्ये आहे. पण अजून एकदाही आयपीएल जिंकू शकलेली नाही. त्यामुळे पंजाब किंग्सला विनर होण्याची प्रतिक्षा आहे.