IND vs ENG | आर अश्विन-रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी, हरभजन-कुंबळेचा महारेकॉर्ड ब्रेक

R Ashwin Ravindra Jadeja | आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियासाठी नवा अध्याय लिहिला आहे. या दोघांनी आपल्याच सिनियर्सचा रेकॉर्ड ब्रेक करत नवा इतिहास घडवला आहे.

IND vs ENG | आर अश्विन-रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी, हरभजन-कुंबळेचा महारेकॉर्ड ब्रेक
| Updated on: Jan 25, 2024 | 11:13 AM

हैदराबाद | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने इतिहास घडवला आहे. अश्विन आणि जडेजा या जोडीने आपल्याच दिग्गजांना मागे टाकत महारेकॉर्ड केला आहे. अश्विन आणि जडेजा या दोघांनी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या आपल्या सिनियर्सचा रेकॉर्ड ब्रेक करत कारनामा केला आहे. अश्विन आणि जडेजा या दोघांनी नक्की काय केलंय, जाणून घेऊयात.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोघे टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ठरले आहे. या दोघांनी हरभजन आणि कुंबळे यांना मागे टाकलंय. अश्विन-जडेजा या रेकॉर्डसाठी 2 विकेट्सची गरज होती. आधी अश्विन आणि त्यानंतर रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेत इतिहास घडवला.

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडचा 55 स्कोअर असताना अश्विनने बेन डकेट याला 35 धावांवर आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर रवींद्र जडेजा याने ओली पोप याला स्लीपमध्ये कॅप्टन रोहित शर्मा याच्या 1 रनवर कॅच आऊट केलं. या विकेटसह अश्विन-जडेजा भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारी जोडी ठरली.

टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारी जोडी

आर अश्विन-रवींद्र जडेजा – 502* विकेट्स.

अनिल कुंबळे-हरभजन सिंह – 501 विकेट्स.

हरभजन सिंह-झहीर खान – 474 विकेट्स.

आर अश्विन-उमेश यादव – 431 विकेट्स.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजाचा ऐतिहासिक कारनामा

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.