AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: 700 धावा ठोकणार, अगोदरच ठेवले होते लिहून… फोनमधील ती नोट ते मैदानातील तुफान… वैभव सूर्यवंशीने सर्वच काही सांगितले

Vaibhav Suryavanshi notes in phone: वैभव सूर्यवंशीच्या एका नोट्सने सध्या क्रिकेट जगतात तुफान आले आहे. त्याच्या फोनमधील त्या नोट्सची आता चर्चा होत आहे. आयपीएल 2026 चा हंगाम या दमदार खेळाडूने गाजवला. त्याने पाच पुरस्कार पटकावले. आता त्याच्या दृढ निश्चियाची एक बाजू समोर आली आहे.

Vaibhav Suryavanshi: 700 धावा ठोकणार, अगोदरच ठेवले होते लिहून... फोनमधील ती नोट ते मैदानातील तुफान... वैभव सूर्यवंशीने सर्वच काही सांगितले
राजस्थान रॉयल्स, वैभव सूर्यवंशीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 03, 2026 | 2:31 PM
Share

Vaibhav Suryavanshi Notes in Phone: IPL 2026 मध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने दमदार खेळी खेळली. हा आयपीएल हंगाम त्याने एकट्यानेच गाजवला. या हंगामात ऐतिहासिक कामगिरी बजावयची हे अगोदरच ठरवल्याचे या 15 वर्षीय खेळाडूने सांगितले. या जबरदस्त कामगिरीची स्क्रिप्ट त्याने अगोदरच लिहिली होती. त्याच्या मोबाईलमध्ये ‘नोट्स’ मध्ये आयपीएल हंगामात 700 धावा ठोकायच्या हे त्याने अगोदरच निश्चित केले नाही तर ते प्रत्यक्षात करूनही दाखवले. त्याने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. त्याच्या उत्तुंग षटकारांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

700 धावांचे स्वप्न, ठोकल्या 776 धावा

राजस्थान रॉयल्सच्या या वंडर किडने भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजले. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्याने फोनमध्ये 700 धावांचा टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्येक सामना संपल्यावर वैभव हा फोन उघडून आपण लक्ष्याच्या किती जवळ पोहचलो, हे तपासत होता. त्याने लक्ष्याचा पाठलाग करणे सोडले नाही. त्याने केवळ उद्दिष्टच पूर्ण केले नाही तर त्यापेक्षा अधिक सरस कामगिरी करून दाखवली. त्याने ऑरेंज कॅप मिळवली. या आयपीएल हंगामात त्याने 776 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 237.30 इतका होता. हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात खतरनाक रेकॉर्ड मानल्या जातो.

जिओ हॉटस्टारशी बोलताना वैभवने याविषयीचा खुलासा केला. इतके पुरस्कार मिळाल्याने छान वाटत आहे. या हंगामात आपल्याला बरचं काही शिकायला मिळालं. मैदानाच्या बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी सरस कामगिरी झाली. मला जर दीर्घकाळ मैदानवर टिकायचं आहे तर मला दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल. माझ्या खेळात सातत्य ठेवावे लागेल. खेळात सुधारणा करावी लागेल असे वैभव म्हणाला. हा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मी फोनमध्ये ‘नोट्स’ ॲपवर किती धावा काढायच्या हे लिहून ठेवले होते. आयपीएल हंगामात 700 धावा चोपून काढायच्या हे ठरवले होते असे वैभवने सांगितले. प्रत्येक सामना संपल्यावर आपण या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठे आहोत हे मी तपासत होतो. मी हे लक्ष्य गाठू शकलो याचा मला आनंद आहे, असे वैभवने सांगितले.

एक हंगाम आणि 5 मोठी बक्षीसं

बिहारमधील या 15 वर्षीय फलंदाजाने या हंगामात विक्रमांची गुढी उभारली. वैभव याने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रेकॉर्डतोड 72 षटकार ठोकले. यासह आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयातील ऑरेंज कॅप जिंकणारा तो खेळाडू ठरला. त्याने गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनचा (2025 मध्ये 23 वर्ष, 231 दिवस) आणि शुभमन गिलचा (2023 मध्ये 23 वर्ष, 263 दिवस) रेकॉर्ड मागे टाकला. वैभव सूर्यवंशीचा या हंगामातील दबदबा दिसून आला. त्याने जवळपास पाच बक्षीसं पटकावली. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन, ऑरेंज कॅप विनर, सुपर सिक्सेज ऑफ द सीझन यावर त्याने मोहर उमटवली.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच