Ranji Trophy: मुंबईच्या रणजी टीममध्ये सचिनच्या मुलाला का निवडलं? चीफ सिलेक्टरने सांगितलं कारण…

| Updated on: Dec 30, 2021 | 2:42 PM

मुंबईच्या सिनियअर संघाकडून अर्जुन दोन टी-20 चे सामने खेळला आहे. रणजीमध्ये तो एकही सामना खेळलेला नाही. मागच्यावर्षी कोविड-19 च्या निर्बंधांमुळे रणजी स्पर्धा होऊ शकली नव्हती.

Ranji Trophy: मुंबईच्या रणजी टीममध्ये सचिनच्या मुलाला का निवडलं? चीफ सिलेक्टरने सांगितलं कारण...
अर्जुन तेंडुलकरचं काय होणार? (Photo - Instagram/arjuntendulkar)
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र आणि दिल्ली विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचा रणजी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व युवा पृथ्वी शॉ कडे देण्यात आले आहे. त्याचवेळी रणजी संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. अर्जुनच्या निवडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्जुनची संघात निवड का केली ? त्यामागे काय कारणे आहेत, ते एमसीएच्या निवड समितीचे प्रमुख सलिल अंकोला यांनी स्पष्ट केलं आहे. (Ranji Trophy Mumbai Chief Selector Gives Reasons For Naming Sachin Tendulkar’s Son Arjun In Ranji Trophy Squad)

ते भारताचे माजी वेगवान गोलंदाजही आहेत. “दुखापतीमधून सावरल्यानंतर अर्जुन चांगली गोलंदाजी करतोय आणि मुंबई क्रिकेटचं भविष्य लक्षात घेऊन संघाची निवड करण्यात आली आहे” असे सलिल अंकोला यांनी सांगितलं. “अर्जुन तेंडुलकर चांगली गोलंदाजी करतोय. दुर्देवाने तो दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीमधून सावरल्यानंतर तो जितके सामने खेळला, त्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे” असे अंकोलाने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

मुंबईच्या सिनियअर संघाकडून अर्जुन दोन टी-20 चे सामने खेळला आहे. रणजीमध्ये तो एकही सामना खेळलेला नाही. मागच्यावर्षी कोविड-19 च्या निर्बंधांमुळे रणजी स्पर्धा होऊ शकली नव्हती. पृथ्वी शॉ संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईच्या संघाला वेगवान गोलंदाज तृषार देशपांडेची उणीव जाणवेल. दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही. सुर्यकुमार यादवचीही उणीव जाणवेल. त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश केला जाऊ शकतो. रणजी संघात स्थान मिळालेले खेळाडू चांगली कामगिरी करतील, असा विश्वास सलिल अंकोला यांनी व्यक्त केला. ज्यूनियर स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांना संघात स्थान मिळाले आहे.

मुंबईचा संघ: पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराझ खान, सचिन यादव, आदित्य तरे (विकेटकिपर), हार्दिक तामोरी (विकेटकिपर), शिवम दुबे, अमान खान, शाम्स मुलन, तांशू कोटीयन, प्रशांत सोळंकी, सशांत आतर्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बादियनी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर

संबंधित बातम्या:

Sharad Pawar | पवारांचं ते कोणतं वाक्य होतं, ज्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला, ऐका पवारांकडून
आमदार लाड सपत्नीक ‘शिवतीर्थ’वर, गप्पा संपेना, शर्मिला वहिनी दारापर्यंत सोडायला
फडणवीस-अजित पवार शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट, आता अजितदादा खाडकन म्हणाले…

(Ranji Trophy Mumbai Chief Selector Gives Reasons For Naming Sachin Tendulkar’s Son Arjun In Ranji Trophy Squad)