रवी शास्त्रींना पुन्हा हेड कोच बनण्यात का रस नाही?, स्वत:च सांगितलं कारण, म्हणाले… 

| Updated on: Sep 18, 2021 | 1:39 PM

जगातील सर्वात श्रीमंत संघापैकी एक असणाऱ्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या रवी शास्त्रींना पुन्हा हे पद भुषवण्यात का इंटरेस्ट नाही, हे त्यांनी नुकतचं स्पष्ट केलं. इंग्लंडच्या एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.

रवी शास्त्रींना पुन्हा हेड कोच बनण्यात का रस नाही?, स्वत:च सांगितलं कारण, म्हणाले... 
रवी शास्त्री
Follow us on

लंडन: भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या अनेक फेरबदल होत असून नुकतंच कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर टी 20 संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) हे देखील मुख्य प्रशिक्षक अर्थात हेड कोचच्या पदावर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना तो वाढवण्यात रस नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण या मागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट नव्हतं. आता शास्त्रींनी स्वत: यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

शास्त्रीनी इंग्लंडमधील एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनण्यात का रस नसल्याचा खुलासा केला आहे.  शास्त्रीं गार्जियन वर्तमानपत्राशी बोलाताना म्हणाले, ”माझ्या मते T20 वर्ल्ड कपनंतरचा लगेचच भारतीय संघाला अलविदा करण्याची वेळच योग्य आहे. मी जितका विचार केला होता, त्यापेक्षा अधिक मला मिळालं. टेस्ट क्रिकेटमध्ये आम्ही 5 वर्ष नंबर 1 ला होतो. ऑस्ट्रेलियामध्ये 2 वेळा जिंकलो, इंग्लंडला नमवलं. त्यामुळे हवं ते सारं मला मिळालं.”

हवं होत त्याहून अधिक मिळालं, आणि काय हवं?-शास्त्री

शास्त्री पुढे बोलताना म्हणाले,”आम्ही व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये जगातील सर्व देशांना धुळ चारली. आम्ही जर आता T20 वर्ल्ड कप जिंकलो तर याहून भारी काहीच नाही. यापेक्षा अजून काय हवं? माझ्या मते मला संघाकडून जे काही हवं होतं. त्यापेक्षा अधिक मला मिळालं आहे. त्यामुळे हीच वेळ हेड कोचच्या पदावरुन उतरण्यासाठी योग्य आहे.”

शास्त्रींची जागा कोण घेणार?

आधी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडच्या नावाची चर्चा होती. पण आता नवीन नाव समोर येत असून हे म्हणजे अनिल कुंबळे (Anil Kumble) हे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्त्तानुसार अनिल कुंबळेला हेड कोचचं पद मिळू शकतं. तर दुसरीकडे बीसीसीआय कुंबळे सोबत वीवीएस लक्ष्मण याचाही विचार करत असल्याची माहिती आहे. लक्ष्मणलाही या पदासाठी अप्लाय कऱण्यासाठी सांगितलं असून या शर्यतीत आणखी एक नाव आहे. हे नाव भारतीय नसून श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याच आहे. जयवर्धनेने आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला उत्तमरित्या प्रशिक्षण दिल्यामुळे त्याला भारतीय संघाचा कोच म्हणूनही निवडलं जाऊ शकतं.

हे ही वाचा :

विराटच्या राजीनाम्यानंतर अनिल कुंबळे पुन्हा मुख्य प्रशिक्षक?, का दिला होता कुंबळेने राजीनामा?

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

(Ravi shastri tells why he dont have intrest in became team indias head coach again)