‘या’ युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, सुनील गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?

विराट कोहली भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. त्यामुळे आता त्यांच्यानंतर कोणाला संधी मिळणार या चर्चेला चांगलाच उधाण आलं आहे.

'या' युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, सुनील गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?
सुनील गावस्कर

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 16 सप्टेंबर रोजी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. कोहलीच्या या घोषणेनंतर सर्वत्र केवळ एकच चर्चा असून नेमकं आता हे पद कोणाला देण्यात येणार याचीच चर्चा आहे. सध्यातरी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाच हे पद मिळण्याची दाट शक्यता आहे. पण या सर्वांमध्ये दिग्गज माजी सुनील गावस्कर (Sunil Gavskar) यांनी भारतीय टी20 संघाचा भावी कर्णधार म्हणून एक वेगळेच नाव सूचित केले आहे.

गावस्कर यांनी भारतीय फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याच्यात कर्णधारपदाचे सर्व गुण असल्याचं सांगत त्याला त्यासाठी तयार करुन कर्णधारपद सोपवणं संघासाठी फायद्याचं ठरेल असंही म्हटलं आहे. गावस्करांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,”जर भारताला एक नवा कर्णधार तयार करायचा आहे, तर केएल राहुलकडे पाहिलं जाऊ शकतं. त्याने नुकतच इंग्लंडमध्येही उत्तम प्रदर्शन केलं. सोबतच आयपीएलमध्येही तो पंजाब संघाकडून एक उत्तम कर्णधार म्हणून खेळी करतो. त्यामुळे त्याच्यात कर्णधार म्हणून सर्व गुण असून त्याच्यावर अजून थोडी मेहनत घेतल्यास तो चांगल्याप्रकारे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवू शकतो.

केएल राहुलची कारकिर्द

29 वर्षीय केएल राहुल भारतीय संघातून आतापर्यंत 38 एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने 5 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 1 हजार 509 धावा केल्या आहे. यासोबतच 40 कसोटी सामन्यात त्याने 6 शतकं आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 321 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने भारतीय संघातून 48 टी 20 सामन्यात 2 शतकं आणि 12 अर्धशतकं झळकाव असून 1 हजार 557 धावा त्याच्या नावावर आहेत.

हे ही वाचा :

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर ‘या’ दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संधी, संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळणार?

विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा

(KL rahul may get captaincy says sunil gavaskar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI