IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

हा खेळाडू आतापर्यंत एकदाही आयपीएलमध्ये खेळला नसून पहिल्यांदाच त्याचा जलवा आयपीएलच्या मैदानात क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार आहे.

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा 'हा' महारथी खेळणार कोणत्या संघातून?
ग्‍लेन फिलिप्‍स

 मुंबई : इंडियन प्रिमीयर लीगला (Indian Premier League) केवळ दोन दिवस राहिले असून 19 सप्टेंबरला दुसरा सामना खेळवला जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलचा 14वा (IPL-14) सीजन मध्येच मे महिन्यात थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता युएईमध्ये उर्वरीत सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान या उर्वरीत पर्वात  पहिल्या पर्वाच्या तुलनेत अनेक खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे संघांनी इतर खेळाडूंसह राखीव खेळाडूंना संधी दिली आहे. याचदरम्यान एका संघाने 18 चेंडूत 88 धावा ठोकणाऱ्या धडाकेबाज खेळाडूला संघात स्थान दिलं आहे.

तर या फलंदाजाचं नाव आहे, ग्‍लेन फिलिप्‍स (Glenn Phillips). न्‍यूझीलंड (New Zealand) संघाचा खेळाडू असणारा हा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये संजू सॅमसनच्या राजस्‍थान रॉयल्‍स (Rajasthan Royals) संघातून खेळमार आहे. 6 डिसेंबर, 1996 दक्षिण आफ्रिकेच्या ईस्टर्न केपमध्ये जन्माला आलेला हा खेळाडू पाच वर्षाचा असताना कुटुंबासह न्यूझीलंडला आला होता. बालपणीपासूनच क्रिकेट खेळणाऱ्या ग्लेनने अखेर 2017 मध्ये न्यूझीलंडकडून डेब्यू केला. विशेष म्हणजे नोव्हेंबर, 2020 मध्ये त्याने न्‍यूझीलंड सर्वात वेगवान टी-20 शतक ठोकलं. त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्द 29 नोव्हेंबर, 2020 मध्ये 51 चेंडूत 108 धावांची तुफान खेळी केली. यावेळी त्याने 18 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकार
ठोकतच 88 धावे केल्या. अवघ्या 46 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. फिलिप्‍स सध्या सीपीएलमध्ये खेळत असून तिथेही उत्तम प्रदर्शन करत आहे. त्याने बारबडोस रॉयल्‍सकडून 10 सामन्यात 31.75 च्या सरासरीने 254 रन्स बनवले आहेत. यामध्ये 16 चौकार आणि तितकेच षटकार लगावले गेले आहेत.

144 सामन्यात 318 चौकार आणि 218 षटकार

ग्‍लेन फिलिप्‍सने न्‍यूझीलंड संघासाठी 25 टी-20 सामन्यात सहभाग घेतला आहे. ज्यातील 22 डावांत 4 वेळा नाबाद राहत  त्याने 506 धावा बनवल्या आहेत. यावेळी त्याने 28.11 च्या सरासरीने हे रन्स केले आहेत. यामध्ये एका शतकासह दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. टी20आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोर 108 आहे. यावेळी 25 सामन्यात त्याने 39 चौकार आणि 29 षटकार ठोकले आहेत. ग्‍लेनने 1 टेस्‍टमध्ये 52 धावाही केल्या आहेत. ग्लेनने टी-20 क्रिकेट या प्रकारात 144 सामन्यात 33.04 च्या सरासरीने 3 हजार 998 धावा केल्या आहेत. यात चार शतक आणिन 25 अर्धशतकं सामिल आहेत. फिलिप्‍सचा नाबाद 116 हा सर्वाधिक स्कोर असून त्याने टी-20 च्या 144 सामन्यात 318 चौकार आणि 218 षटकार ठोकले आहेत.

हे ही वाचा :

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

(New Zealands Glenn Phillips will play for Rajasthan Royals in IPL 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI