AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीचं वन डे कर्णधारपदही काढून घेणार, टीम इंडियात रातोरात खलबतं

पुढील महिन्यात होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. असं मानलं जातंय की, त्याने बॅटिंगमधला फॉर्म मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण त्याला एकदिवसीय फॉरमॅटमध्येही असाच निर्णय घ्यायला लागू शकतो, अशी शक्यता आहे.

विराट कोहलीचं वन डे कर्णधारपदही काढून घेणार, टीम इंडियात रातोरात खलबतं
virat kohli
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 8:08 AM
Share

मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. असं मानलं जातंय की, त्याने बॅटिंगमधला फॉर्म मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण त्याला एकदिवसीय फॉरमॅटमध्येही असाच निर्णय घ्यायला लागू शकतो, अशी शक्यता आहे. कोहलीने म्हटलं आहे की, तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार राहील पण 2023 च्या विश्वचषकात तो भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल, पण सध्या तरी याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.

टी 20 वर्ल्डकपच्या कामगिरीवर पुढची गणितं अवलंबून

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “विराटला याची जाणीव होती की जर संघाने युएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली नाही तर त्याला मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरुन दूर केलं जाऊ शकतं. मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरुन बाजूला होऊन त्याने चांगलंच केलं आहे कारण त्याने स्वत:वरचा दबाव कमी करुन घेतला आहे. जर टी -20 मध्ये उत्तम कामगिरी करण्यात अपयश आलं तर त्याचा परिणाम एकदिवसीय फॉरमॅटच्या कॅप्टन्सीवर होऊ शकतो..”

“नजीकच्या भविष्यात बीसीसीआयने कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यास आश्चर्य वाटायला नको . टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात अपयश आल्यानंतर कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळायला लागू शकतं”

गांगुली-जय शाह यांनी विराटला शुभेच्छा दिल्या पण 2023 वर्ल्डकपविषयी शब्दही काढला नाही

“यात कोणतीही शंका नाहीय की ड्रेसिंग रूममध्ये उपकर्णधार रोहित शर्माला कसलेला लीडर मानलं जातं. जो तरुण खेळाडूंना सोबत घेऊन मार्गक्रमण करणं शिकला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे रोहित शर्मा करत आहे.”

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी जारी केलेल्या बोर्डाच्या निवेदनाच्या मनोरंजक पैलूबद्दल पीटीआयला सांगितलं की, “जर तुम्ही सौरव आणि जय शाह यांची विधाने पाहिली तर दोघांनीही विराटला शुभेच्छा दिल्या पण 2023 च्या विश्वचषकापर्यंत तो कर्णधार असेल की नाही यावर एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे तो कर्णधार राहील या निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही.”

टी 20 विश्वचषकानंतर पद सोडणाऱ्या रवी शास्त्री यांनीही कोहलीशी सविस्तर बातचित केली असल्याची माहिती आहे. आता विराट सचिन तेंडुलकरचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्याच्या त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करेल, अशी माहिती आहे.

(virat Kohli may be loose Indian team ODI Captaincy With dressing Room Drifting away)

हे ही वाचा :

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.