IPL 2026: वैभव सूर्यवंशी अडचणीत आल्याचं पाहून काही सेकंदात रवींद्र जडेजाने फासे फिरवले, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. राजस्थान रॉयल्स संघही या शर्यतीत आहे. पहिल्या पर्वात जेतेपद मिळवल्यानंतर आतापर्यंत हाती निराशा लागली आहे. असं असताना फ्रेंचायझी टीकेची धनी ठरत आहे. त्यामुळेच रवींद्र जडेजाला वैभव सूर्यवंशीला वाचवण्यासाठी पुढे सरसावला.

IPL 2026: वैभव सूर्यवंशी अडचणीत आल्याचं पाहून काही सेकंदात रवींद्र जडेजाने फासे फिरवले, झालं असं की...
IPL 2026: वैभव सूर्यवंशी अडचणीत आल्याचं पाहून काही सेकंदात रवींद्र जडेजाने फासे फिरवले, झालं असं की...
Image Credit source: Rajasthan Royals Twitter
| Updated on: Mar 16, 2026 | 9:14 PM

आयपीएल 2026 अर्थात 19 व्या पर्वात राजस्थान रॉयल्सने कात टाकली आहे. संजू सॅमसनला रिलीज केलं आणि ट्रेड विंडोच्या माध्यमातून रवींद्र जडेजाला घेतलं. त्यामुळे यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्स काही चमत्कार करणार का? याकडे लक्ष असणार आहे. आतापर्यंत आयपीएलची 18 पर्व पार पडली आहे. त्यापैकी पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 17 पर्वात पदरी निराशा पडली. पण यावेळेस संघाची बांधणी जबरदस्त झाली आहे. वैभव सूर्यवंशी हा उभरता तारा आहे. त्यात त्याचा फॉर्मही जबरदस्त आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रतिस्पर्धी संघांना उलट वैभव सूर्यवंशीची धास्ती आहे. पण मैदानाबाहेर वैभव सूर्यवंशीवर एक बाका प्रसंग ओढावला. त्यामुळे रवींद्र जडेजा त्याच्या मदतीसाठी पुढे आला. पण वैभव सूर्यवंशीसोबत नेमकं झालं तरी काय ते जाणून घेऊयात.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्सचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात वैभव सूर्यवंशीवर प्रश्नांचा भडिमार झाला. त्यात एक प्रश्न इतका तिखट होता की रवींद्र जडेजाने समयसूचकता दाखवली आणि वैभव सूर्यवंशीला त्यातून बाहेर काढलं. राजस्थान रॉयल्सने 2008 नंतर एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. त्याला अनुसरून प्रश्न विचारला गेला की, राजस्थान हा प्रदेश दुष्काळग्रस्त मानला जातो आणि 2008 मध्ये तुम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर हा देखील दुष्काळग्रस्त भाग आहे, तर 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आयपीएल जेतेपद मिळवणार का? हा प्रश्न इतका गंभीर होता की, रवींद्र जडेजाने लगेच माईक हातात घेतला आणि वैभव सूर्यवंशीला सावरलं.

रवींद्र जडेजाने सांगितलं की, तुम्ही योग्य बोलला आहेत की आम्ही 2008 नंतर ट्रॉफी जिंकू शकलो नाहीत. आता राजस्थानमध्ये खूप हिरवळ आहे. तुम्ही असं बोलू नका की आता दुष्काळ आहे. खूप ठिकाणी हिरवळ आहे. कोणतीही गोष्टी मोठी होण्यासाठी वेळ लागतो. झाडंही मोठं होते तेव्हा वेळ लागतो. आता झाड मोठं झालं आहे आणि फळं येण्यास सुरूवात झाली आहे.

Follow Us