Asia cup 2022: टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर

| Updated on: Sep 02, 2022 | 6:13 PM

Asia cup 2022: आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे प्रमुख गोलंदाज संघाबाहेर गेला आहे.

Asia cup 2022: टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर
Team india
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आशिया कप स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा संघाबाहेर गेला आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जाडेजाने टीम इंडियाला पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आशिया कप स्पर्धेतून जाडेजा बाहेर गेला असला, तरी टी 20 वर्ल्ड कप संघातील त्याच्या समावेशाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत

BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. सिलेक्शन कमिटीने रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने जाडेजा संघाबाहेर गेला आहे. सध्या बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर लक्ष ठेवून आहे.

सुपर फोर आधी अडचण

टीम इंडियावर हे संकट सुपर फोर फेरीच्या सामन्याआधी आले आहे. भारत सुपर फोरचा पहिला सामना रविवारी 4 सप्टेंबरला खेळणार आहे. टीमला सुपर 4 पर्यंत पोहोचवण्यात जाडेजाने महत्त्वाचे योगदान दिले होते. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात जाडेजा 35 धावांची इनिंग खेळला होता. हाँगकाँग विरुद्ध 15 धावा देऊन एक मोठा विकेटही मिळवला होता.