Asia cup 2022: पुढच्या 5 दिवसात Rohit sharma समोर तीन मोठी चॅलेंजेस, कसं पार करणार आव्हान?

Asia cup 2022: कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आता आशिया कपच्या (Asia cup) सुपर 4 राऊंडची तयारी करतेय.

Asia cup 2022: पुढच्या 5 दिवसात Rohit sharma समोर तीन मोठी चॅलेंजेस, कसं पार करणार आव्हान?
Rohit sharma
Image Credit source: PTI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 02, 2022 | 11:17 AM

मुंबई: कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आता आशिया कपच्या (Asia cup) सुपर 4 राऊंडची तयारी करतेय. बांगलादेशला नमवून सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा श्रीलंका तिसरा संघ ठरला. आता फक्त एक जागा उरली आहे. पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग (PAK vs HKG) सामन्यानंतर तो चौथा संघ कुठला? ते स्पष्ट होईल. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमला सुपर 4 साठी फेव्हरेट समजलं जात आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे काहीही होऊ शकतं. त्यामुळे हाँगकाँगला कमी लेखू नका, अशा इशारा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुंनी दिला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात हाँगकाँगने चांगली कामगिरी केली होती. भारताच्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलगा करताना हाँगकाँगने 152 धावा केल्या. पहिल्या 10 षटकात हाँगकाँगच्या गोलंदाजी चांगली बॉलिंग केली. त्यामुळे भारताची धावगती नियंत्रणात होती.

सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल

आता सुपर 4 मध्ये रोहित शर्मा समोर अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच आव्हान आहे. आजचा सामना पाकिस्तानने जिंकल्यास रविवारी त्यांच्याविरुद्ध खेळाव लागेल. अफगाणिस्तानच्या टीमला अजिबात कमी लेखून चालणार नाही. त्यांनी साखळी फेरीत श्रीलंका, बांगलादेश सारख्या बलाढ्य संघांना नमवलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच चॅलेंज सोप नाहीय. श्रीलंकेने काल अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशला हरवलं. त्यांचं 184 धावांचं मोठ लक्ष्य पार केलं. त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला या दोन्ही टीम्स हरवण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल.

भारताचा श्रीलंका, अफगाणिस्तान विरुद्ध सामना कधी?

आज हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. यांच्यातील एका विजेत्याशी भारताचा रविवारी सामना होईल. 6 सप्टेंबरला भारताचा श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे. 8 सप्टेंबरला भारत आणि अफगाणिस्तान मध्ये लढत होईल. आशिया कप मध्ये भारत-पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने-सामने येण्याची शक्यता जास्त आहे. मागच्या रविवारी भारताने पाकिस्तानला पाच विकेटने नमवून स्पर्धेतील आपलं अभियान सुरु केलं होतं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें