बंगळुरु मेट्रो स्टेशन परिसरात भयानक गर्दीची स्थिती, पाय ठेवण्यासाठी जागा नाही Watch Video

आरसीबीने आयपीएल जेतेपद मिळवल्याच्या दुसऱ्या दिवशी गालबोट लागलं आहे. चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू, तसेच 25 लोकं जखमी झाले आहेत. बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तर मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे.

बंगळुरु मेट्रो स्टेशन परिसरात भयानक गर्दीची स्थिती, पाय ठेवण्यासाठी जागा नाही Watch Video
बंगळुरु मेट्रो स्टेशन परिसरात भयानक गर्दीची स्थिती, पाय ठेवण्यासाठी जागा नाही
| Updated on: Jun 04, 2025 | 6:57 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत 17 वर्षानंतर आरसीबीने जेतेपद मिळवलं. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. स्पर्धा जिंकल्यापासून कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून जल्लोष सुरु आहे. चाहत्यांचा भावना लक्षात घेऊन फ्रेंचायझीने एक्स हँडलवरून संध्याकाळी पाच वाजता विक्टरी परेडची घोषणा केली होती. त्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम पार पडेल असं सांगण्यात आलं. त्यामुळे विजयी परेड पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र अचानक ही परेड रद्द झाल्याचं घोषित करण्यात आलं. सुरक्षा आणि वाहतूक कोंडीचं कारण देऊन ही विक्टरी परेड रद्द करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे खेळाडू मैदानाकडे रवाना झाले. त्यामुळे चाहत्यांनी आपला मोर्चाही थेट चिन्नास्वामी मैदानाकडे वळवला. काही वेळातच स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमभोवती वाहनांच्या प्रवेशावर बंदी असल्याने बहुतेक चाहते मेट्रोने स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. दुपारपासून एमजी रोड आणि क्यूबन पार्क मेट्रो स्टेशनवर गर्दी झाली आहे. बस स्थानकापासून मेट्रो स्थानकापर्यंत प्रचंड गर्दी आहे. बंगळुरूमधील एका मेट्रो स्थानकाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीही होऊ शकतं अशी शंका मनात घर करत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी धक्काबुक्की केली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटक पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर चाहत्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या भिंतीजवळ लोखंडी जाळीतून शॉर्टकट म्हणून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाऊस पडायला सुरुवात झाली आणि लोकांची पळापळ सुरु झाली. यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.

विक्टरी परेड रद्द केल्यानंतर संध्याकाळी 5 ते 6 दरम्यानं स्टेडियममध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात फक्त तिकीट किंवा पास असलेल्या लोकांनाच एन्ट्री होती. त्यामुळे गर्दी आणखी वाढली आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आला. तसेच त्याचे लाईव्ह प्रक्षेपणही बंद करण्यात आलं.