श्रीमंत BCCI कडे 1987 साली WORLD CUP साठी पैसे नव्हते, मग असे जमवले पैसे

| Updated on: Nov 09, 2022 | 10:42 AM

एका मुलाखतीत अनिल अंबानींना विचारण्यात आलं, वर्ल्ड कपची तयारी कुठवर आली? तेव्हा अनिल अंबानींनी प्रतिप्रश्न विचारला. कोणता वर्ल्ड कप? रिलायन्स कप का?

श्रीमंत BCCI कडे 1987 साली WORLD CUP साठी पैसे नव्हते, मग असे जमवले पैसे
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः 1983 मध्ये भारतानं क्रिकेट (Cricket) वर्ल्ड कप (World Cup) जिंकला. पण तेव्हाचे बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष एनकेपी साळवे  यांना हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. . चार तिकिटांपैकी ऐनवेळी लॉर्ड्सवरील व्यवस्थापनाने दोन तिकिटं नाकारली. तो वर्ल्डकप कसा बसा खेळला. पण इंग्लंडची ही मक्तेदारी मोडीत काढायची, असं भारतानं ठरवलं. ही प्रक्रिया काही साधीसुधी नव्हती.

जगभरातील खेळाडूंची बडदास्त ठेवणं आणि त्या तोडीचं आयोजन करणं आशिया खंडातील देशांचं तसं मुश्किलच होतं. पण एका व्यक्तीनं पुढाकार घेतला. भारतात BCCIने असा काही जुगाड केला की 1987 मध्ये भारत पाकिस्ताननं वर्ल्डकपचं आयोजकत्व घेतलं आणि सगळा थाटमाट उत्तमरितीने पार पाडला.

आयोजकत्व कसं मिळालं?

1987 मध्ये भारताने आशिया खंडातील शेजारी देशांशी चर्चा करून वर्ल्ड कप आपल्याकडे आयोजित करण्याचं ठरवलं. पाकिस्तान तयार झाला. भारत-पाकिस्तानने आयोजकत्व पत्करलं. मंजुरी मिळाली. मग मुद्दा होता पैशांचा. वर्ल्डकपची गॅरेंटी मनी आणि इतर खर्चासाठी लागणार होते 30 कोटी रुपये. कशी बशी 10 कोटी रुपयांची बीसीसीआयची तयारी होती. आता उरलेले 20 कोटी रुपये जमवायचे होते.

धीरूभाई अंबानी पुढे आले…

BCCI च्या मदतीला पुढे आले रिलायन्स इंडस्ट्रीचे धीरुभाई अंबानी. आर्थिक मदत करणार म्हटले, पण एक अट घातली. वर्ल्डकपचे टायटल स्पाँसर बनण्याचं. BCCI ने अट मान्य केली. अनिल अंबानी रिलायन्सकडून ऑर्गनायझर बनले.

रिलायन्सने या वर्ल्डकपमधून प्रमोशन मिळवण्याचं ठरवलं. यानिमित्ताने इंग्लंडच्या तावडीतून वर्ल्ड कप तर बाहेर पडलाच. पण रिलायन्सचं नशीब उघडण्यासाठी तो एक मैलाचा दगड ठरला.

एका मुलाखतीत अनिल अंबानींना विचारण्यात आलं, वर्ल्ड कपची तयारी कुठवर आली? तेव्हा अनिल अंबानींनी प्रतिप्रश्न विचारला. कोणता वर्ल्ड कप? रिलायन्स कप का? यावरून हा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता, हे दिसून येतंय.

वर्ल्डकपच्या आधी भारत-पाकिस्तान एक्झिबिशन मॅच होती. त्यातही रिलायन्सने एक अट घातली. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाजूला धीरूभाई अंबानी यांची खुर्ची असावी. ही अटही मान्य करण्यात आली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.

आज जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे खरे प्रमोशन 1987 च्या वर्ल्ड कप आयोजनापासूनच सुरु झाले. मसाल्यांपासून सुरु झालेली ही कंपनी आज टेक्स्टाइल, पेट्रोकेमिकल, टेली कम्युनिकेशन, रिटेल आदी सर्वच क्षेत्रांमध्ये विस्तारलेली आहे.