Rinku Singh | रिंकू सिंह याची तडाखेदार खेळी, दक्षिण आफ्रिके विरुद्ध अर्धशतक

Rinku Singh Fifty | रिंकू सिंह याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात तोडफोड बॅटिंग करत आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं आहे.

Rinku Singh | रिंकू सिंह याची तडाखेदार खेळी, दक्षिण आफ्रिके विरुद्ध अर्धशतक
| Updated on: Dec 12, 2023 | 10:30 PM

ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावले. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल हे दोघेही झटपट आऊट झाले. टीम इंडियाच्या या दोन्ही सलामीवीरांना खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाची 6 बाद 2 रन अशी स्थिती झाली. त्यानंतर तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी झाली. तिलक 29 रन्स करुन आऊट झाला.

तिलकनंतर सूर्यकुमार यादव हा आऊट झाला. रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. या दरम्यान कॅप्टन सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतर सूर्यकुमार 56 धावा करुन माघारी परतला. सूर्यानंतर रिंकूने टीम इंडियाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रिंकूने टीम इंडियाच्या डावातील 16 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एकेरी धाव घेत आंतरराष्ट्रीय टी 20 मधील पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं. रिंकूने अवघ्या 30 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं.

रिंकूने याआधीही टीम इंडियासाठी टी 20 मध्ये अनेकदा फिनिशिंग खेळी केली आहे. मात्र तो चौथ्या पाचव्या स्थानावर येत असल्याने त्याला फार ओव्हर खेळायला मिळत नाही. मात्र टीम इंडियाची सलामी जोडी, त्यानंतर तिलक आऊट झाल्याने रिंकूला लवकर येण्याची संधी मिळाली. रिंकूने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. रिंकूने मैदानात चौफेर फटकेबाजी करत टीम इंडियाचा स्कोअरबोर्ड धावता ठेवला. तसेच सूर्याने आपलं अर्धशतक हे 166.67 च्या स्ट्राईक रेटने पूर्ण केलं.

रिंकूचं पहिलंवहिलं अर्धशतक


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.