T20 World Cup: ‘ऋषभ पंत एका हाताने षटकार खेचत नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचं स्पष्टीकरण

| Updated on: Nov 04, 2021 | 4:42 PM

या भारतीय दिग्गजाच्या मते ऋषभ पंतच नाही तर जगातील कोणताच फलंदाज एका हाताने षटकार ठोकू शकत नाही. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान त्याने हे मत व्यक्त केलं आहे.

T20 World Cup: ऋषभ पंत एका हाताने षटकार खेचत नाही, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचं स्पष्टीकरण
ऋषभ पंत
Follow us on

मुंबई: भारतीय संघात (Indian Cricket Team) सध्या सर्वात आक्रमक फलंदाज म्हटलं तर ऋषभ पंतचच (Rishabh Pant) नाव समोर येतो. त्यात तो एका हाताने षटकार (One Handed Six) ठोकतो. हे आपण पाहिलचं आहे. पण मूळात तो असं करत नसून असं जगातील कोणत्याच खेळाडूला शक्य नाही असं भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने म्हटलं आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतने 13 चेंडूत 207.69 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 27  धावा केल्या. यावेळी त्याने 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला. यावेळी पंतने 3 पैकी 2 षटकार त्याच्या वेगळ्या अंदाजात ठोकले. त्याने एका हाताने ठोकलेले हे षटकार मूळात केवळ दिसायला एका हाताने असल्याचं गंभीरचं मत आहे. त्याने यामागील स्पष्टीकरणही दिलं आहे.

कोणताच फलंदाज एकाहाताने षटकार ठोकू शकत नाही- गंभीर

गौतम गंभीरने भारत-अफगानिस्तान सामन्यांतर स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये सांगितलं की,”जर तुम्ही ऋषभला सिक्स मारताना नीट पाहाल तर तो आधी दोन्ही हाताने बॅट पकडतो आणि बॉल मारल्यावर दुसरा हात सोडतो. त्यामुळे तो एका हाताने षटकार लगावतो असं तुम्ही म्हणू शकत नाही. असं जगातील कोणताच फलंदाज करु शकत नाही.”

भारताचं सेमीफायनलचं गणित

भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ 4 पैकी 4 सामने याआधीच सेमीफायनलच्या लढाईत पोहोचला आहे. आता या गटातून आणखी एक कोणता संघ जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असली तरी भारताचा उर्वरीत दोन सामन्यात विजय जवळपास निश्चित असल्याने भारतही या शर्यतीत आहे. पण न्यूझीलंडने भारताला मात दिली असल्यामुळे न्यूझीलंडला अफगाणिस्तानने मात दिल्यास भारत न्यूझीलंडच्या पुढे जाईल. त्यामुळे रविवारच्या सामन्यात सर्व भारतीय अफगाणिस्तानच्या विजयाची आशा करणार हे नक्की!

हे ही वाचा

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

(Rishabh pant did not hit six with one hand says gautam gambhir)