AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?

भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभवानंतर कमबॅक करत तिसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम असल्या तरी हे सारं येत्या रविवारी स्पष्ट होणार आहे.

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई: भारतीय संघासाठी (Team India) येणारा रविवार फार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे या दिवशी भारताचा कोणताच सामना नसला तरी भारतासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. याच दिवशी भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल की नाही? हे स्पष्ट होईल. या दिवशी न्यूझीलंड आणि अफगानिस्तान (New Zealand and Afghanistan) या संघामध्ये सामना होणार असून सर्व भारतीयाचं लक्ष या सामन्याकडे असेल. कारण या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मात दिल्यास भारताच्या सेमीफायनच्या आशा जीवंत राहणार आहेत.

यंदाच्या विश्वचषकातील पहिले दोन्ही रविवार भारतीयांसाठी निराशामय होते. पहिल्या रविवारी 24 ऑक्टोबरला पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सनी मात दिली. मग दुसऱ्या रविवारी 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिली. त्यानंतर बुधवारी भारताने विजय मिळवला असला तरी येणारा रविवार भारताच्या नशिबी काय घेऊन येणार हे पाहावे लागेल.

असं आहे गणित

भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ 4 पैकी 4 सामने याआधीच सेमीफायनलच्या लढाईत पोहोचला आहे. आता या गटातून आणखी एक कोणता संघ जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असली तरी भारताचा उर्वरीत दोन सामन्यात विजय जवळपास निश्चित असल्याने भारतही या शर्यतीती आहे. पण न्यूझीलंडने भारताला मात दिली असल्यामुळे न्यूझीलंडला अफगाणिस्तानने मात दिल्यास भारत न्यूझीलंडच्या पुढे जाईल. त्यामुळे रविवारच्या सामन्यात सर्व भारतीय अफगाणिस्तानच्या विजयाची आशा करणार हे नक्की!

स्कॉटलंडविरुद्ध भारताला मोठ्या विजयाची गरज

भारताला पुढील फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडचा अफगाणिस्तानकडून पराभव महत्त्वाचा असला तरी नेट-रनरेटवरही भारताला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताचा 5 नोव्हेंबर रोजीचा स्कॉटलंडविरुद्धचा सामना भारताला मोठ्या फरकाने जिंकून नेट-रनरेटमध्येही पुढे जाणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

T20 World Cup: न्यूझीलंडच्या गप्टीलचा स्कॉटलंडविरुद्ध नवा विक्रम, विराटचं रेकॉर्ड धोक्यात

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

(In t20 world cup team india will play semi final if afghanistan beat new zealand on 7th november)

Follow Us
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा