T20 World Cup: न्यूझीलंडच्या गप्टीलचा स्कॉटलंडविरुद्ध नवा विक्रम, विराटचं रेकॉर्ड धोक्यात

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टील याने स्कॉटलंडविरुद्ध धडाकेबाज 93 धावा ठोकल्या. यासोबतच त्याने टी20 क्रिकेटमधील एक मोठं शिखरही गाठलं आहे.

1/5
न्यूझीलंडचा दिग्गज फंलदाज मार्टिन गप्टिलने स्कॉटलंड संघाविरुद्ध लगावलेल्या 93 धावांच्या जोरावर एक खास लीस्टमध्ये जागा मिळवली आहे. या यादीत फक्त विराटचं नाव असून गप्टील दुसरा फलंदाज ठरला आहे. ही यादी म्हणजे है टी20 इंटरनॅशनल सामन्यात 3 हजारांहून अधिक धावा करणारे फलंदाज. विराटनंतर गप्टीलने या यादीत स्थान मिळवलं आहे.

2/5
35 वर्षीय गप्टिलने बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील स्कॉटलंड   विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याने 56 चेंडूत 93 धावा केल्या यात 7 षटकार आणि  6 चौकार सामिल होते.

3/5
सामन्यात गप्टीलने 24 वी धाव पूर्ण करताच तो विराटच्या यादीत पोहोचला. त्याने 105 सामन्यात 101 डाव खेळत ही कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर आता 3 हजार 69 धावा असून यामध्ये 2 शतकं आणइ 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

4/5
या यादीत गप्टीलच्या पुढे असणाऱ्या विराटने 92 डावांत 86 डावांत 3 हजार 225 धावा करत अव्वलस्थान कायम राखलं आहे. त्याने शतक ठोकलं नसलं तरी 29 अर्धशतकं ठोकली आहेत.

5/5
गप्टीलने सामन्यात 3 हजार धावा पूर्ण करण्यासोबत आणखी एक विश्वविक्रम केला. त्याने सामन्यात 7 षटकार लगावत 150 षटकार पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात ही कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याने 154 षटकार लगावले असून दुसऱ्या नंबरवर भारताचा रोहित शर्मा 134 षटकारांसह आहे.

Published On - 7:49 am, Thu, 4 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI