Rishabh Pant Health Update: ऋषभला मुंबईत हलवणार, ‘या’ देशात होऊ शकते सर्जरी

| Updated on: Jan 04, 2023 | 3:07 PM

Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या हेल्थबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलीय. त्याला डेहराडूनहून मुंबईत हलवण्यात येणार आहे. ऋषभला मुंबईत हलवण्याची वेळ का आली?

Rishabh Pant Health Update: ऋषभला मुंबईत हलवणार, या देशात होऊ शकते सर्जरी
rishabh pant
Image Credit source: twitter
Follow us on

Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंतच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलीय. त्याला अधिक चांगल्या उपचारांसाठी लवकरच डेहराडूनहून मुंबईत हलवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. ऋषभला डेहराडूनच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. मागच्या शुक्रवारी ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवे वर भीषण अपघात झाला. सुदैवाने ऋषभ या अपघातातून बचावला. पण तो गंभीर जखमी झाला आहे.

कुठल्या देशात होणार सर्जरी?

ऋषभ पंतला चांगले उपचार आणि लिगामेटच्या त्रासामुळे डेहराडूनहून मुंबईला शिफ्ट करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे ऑर्थोपेडिक डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीखाली ऋषभवर उपचार होतील. ऋषभ पंतवर सर्जरीचा सल्ला दिल्यास इंग्लंड, अमेरिकेत शस्त्रक्रिया होऊ शकते.


धोनीसोबत नाताळ साजरा केला

दुखापतीमुळेच ऋषभ पंतची टी 20 आणि वनडे टीममध्ये निवड करण्यात आली नव्हती. बीसीसीआयने ऋषभला बंगळुरुच्या NCA मध्ये जाण्यास सांगितलं होतं. नाताळ साजरा करण्यासाठी तो दुबईला गेला होता. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत नाताळ साजरा केला.

ऋषभला मुंबईला का हलवणार?

मायदेशी परतल्यानंतर ऋषभ कारने दिल्लीहून होम टाऊन रुडकी येथे चालला होता. याच दरम्यान 30 डिसेंबरला ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. रुडकीजवळ गुरुकुल नारसन येथे हा अपघात झाला. पंतची कार डिवायडर तोडून पलटी झाली. त्याच्या कारला आग लागली. ऋषभला विंडो स्क्रीन तोडून बाहेर यावं लागलं. ऋषभ या अपघातातून बचावला. पण त्याला मार लागला आहे. आता अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला मुंबईला शिफ्ट करण्यात येणार आहे.