
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने एकाना स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 70 व्या सामन्यात शतक झळकावलं. पंतने शतकासह अनेक हिशोब क्लिअर केले. (Photo Credit : IPL/Bcci)

ऋषभ पंत याने 54 चेंडूत 116.67 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं.पंतने या शतकी खेळीत 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)

ऋषभने शतकी खेळीतील 100 पैकी 76 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. पंतच्या या खेळीत 6 सिक्स आणि 10 चौकारांचा समावेश होता. (Photo Credit : IPL/Bcci)

पंतने आरसीबी विरुद्ध नाबाद 118 धावांची खेळी केली. पंतने 11 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 193.44 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. (Photo Credit : IPL/Bcci)

दरम्यान ऋषभ पंतच्या आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. पंतने अशाप्रकारे या हंगामातील एकूण 14 सामन्यांमध्ये 24.45 च्या सरासरीने आणि 133.17 या स्ट्राईक रेटने एकूण 269 धावा केल्या. पंतने या दरम्यान 16 सिक्स आणि 23 फोर लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)