PHOTO : BCCI ची बंदी झुगारली, पंतसह बडे खेळाडू युरो, विम्बल्डनला, रवी शास्त्रींच्या नावाने हद्दच झाली!

| Updated on: Jul 15, 2021 | 5:35 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला जवळपास 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. यावेळी सर्व संघ आपल्या फॅमिलीसोबत इंग्लंडमध्ये एन्जॉय करत होता.

1 / 5
भारतीय संघाला 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वीच संघावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंतसह एका सपोर्ट स्टाफ मेम्बरला कोरोनाची बाधा झाली आहे. बीसीसीआयने पंतचे नाव अधिकृतरित्या जाहिर केले नसले तरी यापूर्वीच बीसीसीआय सचिन जय शहा यांनी खेळाडूंना इंग्लंडमध्ये युरो, विम्बल्डनसारख्या भव्य स्पर्धांना हजेरी न लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान पंतने युरो स्पर्धेच्या एका सामन्याला हजेरी लावली होती. ज्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. पण अशाप्रकारे बीसीसीआयचे आदेश जुगारनारा पंत एकटा नसून अजूनही काही खेळा़डू आहेत.

2 / 5
पंतप्रमाणेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) पत्नी संजनासोबत इटली आणि बेल्जियम यांच्यातील युरो चषकाचा सेमीफायनल सामना पहायला गेला होता.

3 / 5
बुमराह आणि पंत यांच्याप्रमाणे भारताचा मधस्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी (Hanuma Vihari) हा देखील युरो चषकाचा सामना पाहण्यासाठी मैदानात गेला होता. विहारी 7 जुलैला डेन्मार्क आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलता सामना पाहण्यासाठी गेला होता.

4 / 5
भारताचा स्टार फिरकीपटू आर आश्विनही विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी गेला होता. सुदैवाने त्याला कोरोनाची लागण झाली नसूुन तो सध्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे.

5 / 5
खेळाडूच काय तर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही नियम जुगारुन विम्बल्डनला हजेरी लावली होती. ते पुरुष एकेरीचा नोव्हाक आणि मातेयो यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते.