PBKS vs CSK IPL 2022: पंजाबचा Rishi Dhawan असं वेगळं फेस मास्क घालून गोलंदाजी का करत होता? कारण आलं समोर

| Updated on: Apr 26, 2022 | 8:25 AM

PBKS vs CSK IPL 2022: कालच्या सामन्यात ऋषी धवनच्या गोलंदाजीबरोबर आणखी एका गोष्टीची चर्चा झाली. ऋषी धवन एक वेगळा फेस मास्क घालून गोलंदाजीला आला होता.

PBKS vs CSK IPL 2022: पंजाबचा Rishi Dhawan असं वेगळं फेस मास्क घालून गोलंदाजी का करत होता? कारण आलं समोर
PBKS Rishi Dhawan
Follow us on

मुंबई: पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (PBKS vs CSK) काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या मॅचमध्ये पंजाबने 11 धावांनी बाजी मारली. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 88 धावांच्या खेळीमुळे पंजाबचा विजयाचा मार्ग सुकर झाला. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि एमएस धोनीने (MS dhoni) विजयासाठी शर्थ केली. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. पंजाब किंग्सच्या 188 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबच्या विजयात काल दोन धवन हिरो ठरले. एकाने बॅटने कमाल केली, तर दुसऱ्याने बॉलने. पंजाबचा सलामीवीर शिखर धवन बद्दल सगळ्यांनाच माहित आहे. त्याला सगळेच ओळखतात. पण ऋषी धवन (Rishi Dhawan) ज्याने शेवटच्या षटकात महत्त्वाची भूमिका बजावली. समोर महेंद्र सिंह धोनी स्ट्राइकवर होता. पहिल्या चेंडूवर त्याने सिक्स खाल्ला. पण नंतर मात्र धोनीची विकेट काढून पंजाबला चौथा विजय मिळवून दिला. गुणतालिकेत CSK ची टीम आता शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.

फेस मास्कचा VIDEO व्हायरल

कालच्या सामन्यात ऋषी धवनच्या गोलंदाजीबरोबर आणखी एका गोष्टीची चर्चा झाली. ऋषी धवन एक वेगळा फेस मास्क घालून गोलंदाजीला आला होता. त्याने घातलेल्या फेस मास्कचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऋषी धवनने असा फेस मास्क का घातला होता? त्यामागे काय कारण आहे? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

सर्वांच लक्ष वेधून घेतलं

कागिसो रबाडा आणि संदीप शर्माने पहिली चार षटक टाकली. त्यानंतर कॅप्टन मयंक अग्रवालने पाचव्या ओव्हरसाठी ऋषी धवनला पाचारण केलं. धवन एक वेगळचं फेस मास्क घालून गोलंदाजीला आला होता. त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ऋषी एक पारदर्शक फेस मास्क घालून गोलंदाजी करत होता. त्याने त्याचं नाक आणि वरचा चेहरा झाकला जात होता.

असं फेस मास्क का घातलं?

ऋषीचा फेस मास्क पाहून प्रत्येकाला, त्याने असं फेस मास्क का घातलय? असा प्रश्न पडला होता. या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाहीय. पण चेंडू नाकाला लागू नये, यासाठी ऋषीने असं हेल्मेट सारखं दिसणारं फेस मास्क घातल्याची माहिती समोर आली आहे. ऋषीची अलीकडेच नाकाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याला पुन्हा धोका पत्करायचा नव्हता. म्हणून तो असं मास्क घालून गोलंदाजीसाठी आला होता. ऋषी धवन हिमाचल प्रदेशचा असून त्याने काल चांगली गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 39 धावा देत शिवम दुबे आणि एमएस धोनी सारख्या फलंदाजांच्या महत्त्वाच्या विकेट मिळवल्या.