AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs PBKS Match Result: Punjab kings च्या विजयात दोन धवन ‘हिरो’, स्पेशल Highlights चे व्हिडिओ पहाच

CSK vs PBKS Match Result: पंजाबचा हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत.

CSK vs PBKS Match Result: Punjab kings च्या विजयात दोन धवन 'हिरो', स्पेशल Highlights चे व्हिडिओ पहाच
pbks ipl 2022 Image Credit source: IPL
| Updated on: Apr 26, 2022 | 12:04 AM
Share

मुंबई: IPL 2022 मध्ये पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर (PBKS vs CSK) विजय मिळवला आहे. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबच्या विजयात दोन धवन हिरो ठरले. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 27 धावांची गरज होती. धोनी खेळपट्टीवर होता. त्यामुळे विजयाच्या आशा कायम होत्या. धोनीने सुरुवातही तशीच केली होती. ऋषी धवन शेवटची ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकला. त्यानंतर त्याने वाईड बॉल टाकला. पण तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. तिथे चेन्नईचा पराभव निश्चित झाला.

रायुडू, धोनीने आशा जागवली पण…..

चेन्नईला या सामन्यात विजयाच्या आशा पल्लवित करता आल्या, त्या अंबाती रायुडूमुळे. रायुडूने आज खेळपट्टीवर आल्यापासून तुफान बॅटिंग केली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने 39 चेंडूत 78 धावा फटकावल्या. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पण मोक्याच्याक्षणी कागिसो रबाडाच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला. ती गेमचेंजिग ओव्हर ठरली. चेन्नईच्या तीन विकेट आज झटपट गेल्या. पण ऋतुराज गायकवाड आणि रायुडूने दबाव न घेता खेळ सुरु ठेवला. ऋतुराजने 30 धावांची खेळी केली. धोनीने आठ चेंडूत 12 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता.

पहा अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची तुफान खेळी

पहा परफेक्ट यॉर्करवर अंबाती रायुडूची गेम चेंजिंग विकेट

धोनीने मारलेला हा SIX पहा

आज शिखरने केली गब्बर खेळी

तत्पूर्वी शिखर धवनमुळे पंजाबला आज 187 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा हा ओपनर आज आपल्या खऱ्या फॉर्ममध्ये दिसला. शिखर धवन म्हणजे गब्बरने आज CSK च्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. जो गोलंदाज समोर आला, त्याची धवनने धुलाई केली. शिखर धवनने आज 59 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते.

शिखर धवनची क्लासिक इनिंग पहाण्यासाठी इथे क्लिक करा

6 हजार धावा करणारा शिखर दुसरा फलंदाज

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखरने आज 6 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली नंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे.धवनने सोमवारी सीएसके विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा गाठला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव काढून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. शिखर धवनचं दिल्ली कॅपिटल्सकडून आय़पीएल करीयर सुरु झालं होतं. त्याने पहिल्याच सामन्यात मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली होती. 2019 ला पुन्हा तो दिल्लीच्या संघात आला. त्याआधी तो सनरायजर्स हैदराबादकडून खेळला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं