
रियान पराग याच्यासाठी 2024 हे वर्ष खूपच छान गेलं. आयपीएल 2024 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. आयपीएल स्पर्धेत त्याने केलेल्या कामगिरीचं कौतुक झालं. या खेळीच्या जोरावर त्याला टीम इंडियाचं दार खुलं झालं. असं असताना मागच्या वर्षी रियान पराग एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला होता. रियान परागने आयपीएल संपल्यानंतर केलेल्या गोष्टींचा उहापोह झाला होता. कारण त्याची युट्यूब हिस्ट्री व्हायरल झाली होती. यात त्याने सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना सर्च केलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने अंदाज बांधत होता. पण आता रियान परागने या वादावर मौन सोडलं आहे आणि खरं काय ते सांगितलं आहे. झालं असं की, सोशल मीडियावर रियान परागचं गेमिंग सेशनची लाईव्ह स्ट्रीमिंग खूप व्हायरल झाली होती. लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान रियान कॉपी फ्री म्युझिक सर्च करत होता. पण यावेळी तो स्क्रिन हाइड करण्यास विसरला आणि सर्च लिस्टमधलं सर्वांसमोर उघड झालं.
रियान परागच्या सर्च लिस्टमध्ये सारा अली खान हॉट आणि अनन्या पांडे हॉट लिहिलेलं दिसलं होतं. यामुळे रियान पराग खूपच ट्रोल झाला होता. पण रियानने यावर तेव्हा कोणतंच स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण रियान परागने सिटी 1016 रेडिओ स्टेशनवर मुलाखतीत सांगितलं की ही घटना आयपीएल 2024 पूर्वीची आहे. जेव्हा मी डिस्कॉर्ड टीमसह स्ट्रीमिंग सर्च करत होतो. पण माझी सर्च हिस्ट्री चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली, असंही तो पुढे सांगितलं.
रियान परागने सांगितलं की, ‘आयपीएल संपल्यानंतर मी चेन्नईत होतो. सामन्यानंतर मी स्ट्रीमिंग टीमसोबत एक डिस्कॉर्ड कॉलवर होतो. ते सार्वजनिक झालं. पण ते आयपीएलपूर्वी झालं होतं. माझ्या डिस्कॉर्ड टीमममध्ये एका व्यक्तीने आयपीएलपूर्वी मला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मी लगेच हटवलं. पण आयपीएलमध्ये प्रसिद्धी मिळाली आणि माझं सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. मी आलो आणि माझं स्ट्रीमिंग ओपन केलं. माझ्याकडे स्पॉटीफाय आणि एप्पल म्युझिक नव्हतं.सर्वकाही डिलीट झालं होतं. तेव्हा मी युट्यूबवर गाणं ऐकण्यासाठी गेलो आणि मी गाणं सर्च केलं. पण मला माहिती नव्हतं की काय होत आहे. पण जसं माझं स्ट्रीमिंग संपलं. तेव्हा मला कळलं की हे व्हायरल होत आहे, मी तर घाबरलो होतो.’
‘ही गोष्ट खूपच गाजली. मला वाटलं नाही की इतकं मोठं कारण आहे की, सर्वांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यायला हवं. कारण तेव्हा ते कोणाला कळलंच नसतं.’, असंही रियान पराग पुढे म्हणाला.