IND vs SL: रोहित शर्माने अर्शदीपचा सल्ला धुडकावला? कॅप्टनवर भडकले फॅन्स, VIDEO

आशिया कपमध्ये मंगळवारी टीम इंडिया आणि श्रीलंकेत सामना झाला. श्रीलंकेने या मॅचमध्ये 6 विकेटने विजय मिळवला. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' होता.

IND vs SL: रोहित शर्माने अर्शदीपचा सल्ला धुडकावला? कॅप्टनवर भडकले फॅन्स, VIDEO
rohit-arshdeep
Image Credit source: social media
| Updated on: Sep 07, 2022 | 4:36 PM

मुंबई: आशिया कपमध्ये मंगळवारी टीम इंडिया आणि श्रीलंकेत सामना झाला. श्रीलंकेने या मॅचमध्ये 6 विकेटने विजय मिळवला. भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. टीम इंडियाच आव्हान आता जवळपास संपुष्टात आलं आहे. आज पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे. त्या निकालावर बरच काही अवलंबून आहे.

लगेच त्याची मान फिरवली

श्रीलंकेविरुद्ध अर्शदीपने शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये 7 धावांचा बचाव करण्याची अर्शदीपव जबाबदारी होती. या लास्ट ओव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अर्शदीप रोहितला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण रोहितने लगेच त्याची मान फिरवली व निघून गेला.

फॅन्स रोहित शर्मावर नाराज आहेत

रोहीतची ही कृती नेटीझन्सना पटली नाही. ते त्यावर कमेंट करतायत. कॅप्टन रोहितने अर्शदीपचा सल्ला ऐकला नाही का? असा त्यांचा प्रश्न आहे. अर्शदीप फिल्डमध्ये काही बदल सुचवत होता का? हा व्हिडिओ व्हायरल होतोय. फॅन्स रोहित शर्मावर नाराज आहेत. रोहित आणि अर्शदीपच्या या व्हिडिओवर फॅन्सनी काही मीम्सही बनवले आहेत. रोहितला नेटीझन्सनी बरच काही सुनावलं आहे.