Asia cup 2022: रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये खोट? ‘या’ 4 निर्णयांमुळे पराभवाचा फटका

Asia cup 2022: आशिया कप 2022 स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार कोण? सर्वांच एकच उत्तर होतं, टीम इंडिया. पण आता हीच टीम स्पर्धेतून जवळपास बाहेर गेली आहे.

Asia cup 2022: रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये खोट? या 4 निर्णयांमुळे पराभवाचा फटका
rohit sharma
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 07, 2022 | 2:47 PM

मुंबई: आशिया कप 2022 स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार कोण? सर्वांच एकच उत्तर होतं, टीम इंडिया. पण आता हीच टीम स्पर्धेतून जवळपास बाहेर गेली आहे. दुसऱ्याटीमच्या जय-पराजयावर टीम इंडियाचं स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे. सुपर 4 राऊंडच्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. आधी पाकिस्तान विरुद्ध नंतर काल श्रीलंकेकडून पराभव झाला. आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनाची अनेक कारणं आहेत. यात टीम मॅनेजमेंट आणि रोहित शर्मा सुद्धा एक आहे. कॅप्टन कुठल्याही संघाचा प्राण असतो. त्याचे निर्णय जय-पराजयाला जबाबदार असतात. रोहित शर्माच्या अशाच काही निर्णयांचा टीम इंडियाला फटका बसला.

रोहित शर्माचे कुठले निर्णय चुकले?

  1. रोहित शर्माने आशिया कपच्या सुपर 4 राऊंडमध्ये योग्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली नाही. टीम दोन्ही सामन्याच चार गोलंदाजांसह खेळली. हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज होता. क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मेटमध्ये टीमच्या विजयात गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असते. रोहित शर्माची चार गोलंदाजांची रणनिती टीमवर भारी पडली. दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र तरीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. ऋषभ पंतवर टाकलेला जास्त विश्वासही नडला.
  2. रोहित शर्मा सुपर 4 राऊंडमध्ये खेळाडूंना योग्य पद्धतीन मॅनेज करु शकला नाही. दीपक हुड्डाला स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं. त्याला खाली फलंदाजीसाठी आणलं. गोलंदाजीतही त्याचा योग्य उपयोग केला नाही. दोन्ही सामन्यात रोहितकडे दीपक हुड्डाकडे चेंडू सोपवण्याची संधी होती.
  3. रोहित शर्मा गोलंदाजांचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी ओळखला जातो. पण सुपर 4 राऊंडमध्ये त्याच्याकडून चूक झाली. श्रीलंकेविरोधात चेंडूला स्विंग मिळत होता. सुरुवातीला अर्शदीप सिंहला फक्त एक ओव्हर दिली. शेवटच्या षटकातही रोहितकडून चूक झाली. अर्शदीप सिंह यॉर्कर टाकण्यात तरबेज आहे. त्याच्याकडे 19 वी ओव्हर दिली नाही. भुवनेश्वरकुमारला 19 व षटक दिलं. त्या ओव्हरमध्ये 14 धावा गेल्या. याआधीच्या मॅचमध्ये सुद्धा भुवनेश्वर 19 व्या ओव्हरमध्ये अपयशी ठरला होता.
  4. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटसाठी आक्रमक रणनिती आखली आहे. वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतायत. ज्यामुळे टीमवर दबाव येतोय. श्रीलंकेविरुद्ध असंच घडलं. सूर्यकुमार आणि विराट सारख्या खेळाडुंनी वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टीवर ते टिकू शकले नाहीत. त्याचा टीमला फटका बसला.