Ind vs Aus: लास्ट ओव्हरमध्ये ऋषभ पंतच्या आधी दिनेश कार्तिकला का पाठवलं? Rohit Sharma ने सांगितलं कारणं….

Ind vs Aus: खरंतर त्यावेळी माझ्या मनात गोंधळ उडालेला होता, पण....

Ind vs Aus: लास्ट ओव्हरमध्ये ऋषभ पंतच्या आधी दिनेश कार्तिकला का पाठवलं? Rohit Sharma ने सांगितलं कारणं....
Dinesh Karthik-Rishabh Pant
Image Credit source: AFP
| Updated on: Sep 24, 2022 | 11:43 AM

मुंबई: नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर काल भारत-ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा T20 सामना झाला. सहा विकेट राखून टीम इंडियाने हा सामना जिंकला. या विजयामुळे टीम इंडियाने आता तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पावसामुळे ही मॅच 8 ओव्हर्सची खेळवण्यात आली. एरॉन फिंच (15 चेंडू 31 धावा) आणि मॅथ्यू वेड (20 चेंडू 43 धावा) यांच्या बळावर 5 बाद 90 धावा केल्या.

झम्पाने दिले हादरे

विजयासाठी 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा-केएल राहुल जोडीने दमदार स्टार्ट दिली. 3 ओव्हर्समध्ये 39 धावा होत्या. त्यावेळी केएल राहुलच्या रुपाने पहिली विकेट गेली. रोहित शर्मा एकाबाजूने किल्ला लढवत होता. दुसऱ्याबाजूने विकेट जात होते. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज झम्पान मिडल ओव्हर्समध्ये टीम इंडियाला हादरे दिले. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुलची विकेट त्याने काढली.

शर्मा-कार्तिक जोडी क्रीजवर होती

लास्ट ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची गरज होती. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकची जोडी क्रीजवर होती. डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. कार्तिकने त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून मॅचच संपवली.

यावर्षी आयपीएलमधल्या दमदार कामगिरीमुळे दिनेश कार्तिकसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. त्याला फिनिशरचा रोल दिला आहे. कालच्या मॅचमध्ये त्याने आपली भूमिका चोख बजावली. कालच्या मॅचमध्ये ऋषभ पंतच्या आधी दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

कार्तिकला पाठवण्यामागच कारणं रोहितने सांगितलं

“ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिककडे फिनिशरचा रोल आहे” असं कॅप्टन रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं. “डॅनियल सॅम्सची लास्ट ओव्हर खेळण्यासाठी ऋषभ पंतला पाठवायचं की, दिनेश कार्तिक याबद्दल माझ्या मनात गोंधळ होता. पण अखेरीस मी दिनेश कार्तिकला पाठवलं. आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये तो आमच्यासाठी फिनिशरचा रोल निभावणार आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.