AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली गुड न्यूज

LPG Cylinder : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतातही गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली गुड न्यूज
LPG ImportImage Credit source: AI
| Updated on: Mar 13, 2026 | 3:37 PM
Share

इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे भारतातही गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने आता LPG ची अतिरिक्त खेप अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशिया यांसारख्या नवीन देशांकडून मागवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खाडी प्रदेशातून जिथे पुरवठा उपलब्ध आहे, तिथूनही खरेदी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे भारतातील LPG सिलिंडरची चिंता लवकरच मिटण्याची शक्यता आहे.

भारतात अनेक ठिकाणी एलपीजी सिलिंडरची कमतरता जाणवत आहे. यावर बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, ‘जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा LPG आयातदार असल्यामुळे भारत सध्या मर्यादित पुरवठ्याच्या आव्हानाला सामोरे जात आहे. केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना सल्ला दिला आहे की हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला एका महिन्यासाठी बायोमास, केरोसिन आणि कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून LPG चा वापर कमी करता येईल.’

भारत आखाती देशांमधून 60% गॅस आयात करायचा

हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, पूर्वी भारत आपल्या LPG गरजेपैकी सुमारे 60% आयात आखाती देशांमधून करत होता, मात्र आता खरेदीचे स्रोत वाढवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आणि उद्योगांना विक्री कमी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील सुमारे 33.3 कोटी घरांना गॅसची कमतरता भासणार नाही.’ पुढे बोलताना पुरी म्हणाले की, ‘घरगुती LPG पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. मात्र ग्राहकांच्या मनात गॅस मिळणार नाही याबाबत भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे.’

जगभरात तेलाची कमतरता

अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहेत. यामुळे आखाती देशांचा प्रदेश आणि स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जहाजांची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. याचा परिणाम भारताच्या कच्चे तेल, LPG आणि LNG पुरवठ्यावरही झाला आहे. सरकारच्या उपाययोजनांनंतरही रेस्टॉरंट, हॉटेल आणि अनेक उद्योगांना LPG च्या मर्यादित पुरवठ्याचा परिणाम जाणवू लागला आहे, मात्र आता भारत सरकारने यावर उपाय शोधला आहे.

Follow Us
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना