AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Warm up Match: आता अशी हालत, तर वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच काय होणार?

विश्वास नाही बसत, धावांसाठी रोहित शर्मा तरसला, पहिली धाव घेण्यासाठी इतकी षटकं लागली

IND vs AUS Warm up Match: आता अशी हालत, तर वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच काय होणार?
rohit sharmaImage Credit source: tv9marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 10:54 AM
Share

मुंबई: ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) सराव सामना सुरु आहे. पहिल्या वॉर्म अप मॅचमध्ये केएल राहुलने (KL Rahul) तुफानी बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र फ्लॉप ठरला. राहुलने 33 चेंडूत 57 धावा फटकावल्या. रोहित शर्मा फक्त 15 रन्सवर आऊट झाला.

रोहितचा स्ट्राइक रेट किती होता?

रोहित शर्माचा बॉल मिडल करताना म्हणजे बॅटच्या मधोमध घेतानाही संघर्ष सुरु होता. तो 14 चेंडू क्रीजवर होता. पण तेव्हा सुद्धा त्याचा संघर्ष सुरु होता. रोहितला एगरने आऊट केलं. भारतीय कॅप्टनचा स्ट्राइक रेट फक्त 107.14 चा होता.

रोहितने कधी खात उघडलं?

खेदाची बाब म्हणजे रोहित शर्माला पहिल्या चार ओव्हरमध्ये खातही उघडता आलं नाही. पाचव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने खात उघडलं. त्यानंतर रोहित शर्माने मॅक्सवेलच्या चेंडूवर चौकार आणि षटकार खेचला. पण एगरच्या गोलंदाजीवर त्याने विकेट गमावला.

मागच्या 10 मॅचमध्ये रोहितने किती अर्धशतक झळकवली?

राहुल आणि रोहितमध्ये 78 धावांची भागीदारी धाली. त्याच राहुलच्या एकट्याच्या 57 धावा होत्या. रोहित शर्मा मॅच दरम्यान खूप संघर्ष करताना दिसला. रोहित शर्माच्या मागच्या 10 टी 20 मॅचमधील इनिंगबद्दल बोलायच झाल्यास, त्याने फक्त एक अर्धशतक लगावल आहे.

रोहितच नाही वॉर्मअप मॅचमध्ये विराट कोहलीची बॅट सुद्धा शांतच होती. विराट 13 चेंडूत 19 धावा करुन आऊट झाला. आपल्या छोट्या इनिंग दरम्यान विराट काही चांगले फटकेही खेळला.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेवन: एरॉन फिंच, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेविड, जॉश इंग्लिस, पॅट कमिंन्स, एश्टन एगर, मिचेल स्टार्क आणि केन रिचर्डसन.

भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.