
मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सने कॅप्टन रोहित शर्माचा वाढदिवस साजरा केला. येत्या 30 एप्रिलला रोहित शर्मा 36 वर्षांचा होईल. मुंबई इंडियन्सच्या टीममधील सदस्य आणि सपोर्ट् स्टाफने मुंबईत प्री-बर्थ डे सेलिब्रेशन करुन रोहितच्या वाढदिवसाला अधिक खास बनवलं.
रोहितच्या प्री बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झालेत. त्यात रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रितिका सजदेह, टीममधील सदस्य टिम डेविड, रिले मेरेडिथ आणि मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी दिसतायत.
सर्वांचा लूक कसा होता?
सर्व सेलिब्रिटी कॅज्युएल लूकमध्ये दिसतायत. रोहितने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता, तर पत्नी रितिका सजदेह हिरव्या रंगाच्या वनपीसमध्ये आहे.
Happy Birthday In Advance Rohit Sharma ??…. We loves you♥️?
Proud Of You Idolo??❤️?@ImRo45 || #RohitSharma?#HappyBirthdayHitman ? pic.twitter.com/vNmb2RTcW0
— ʀᴀᴊɴᴀɴᴅᴀɴɪ ꜱɪɴɢʜ⁴⁵?? ( Rohika) (@Singh_Ro45) April 29, 2023
रोहितचा 60 फुटी कट आऊट
चाहत्यांनी सुद्धा रोहितचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात कुठलीही कसर ठेवलेली नाही. हैदराबादमध्ये रोहित शर्माचा 60 फुटी कट आऊट बनवण्यात आलाय. हा मोठा कट आऊट असून चाहते त्या कट आऊटला हार घालून आणि छोटी पूजा करुन सेलिब्रेश करतायत. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा टीम इंडियातील दुसरा लोकप्रिय़ क्रिकेटपटू आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी फॉलोइंग आहे.
विराटच्या फॅन्सकडून रोहितला शुभेच्छा
रोहित आणि विराटने फॅन त्यांच्या-त्यांच्यासाठी निष्ठावान आहेत. पण बर्थ डे सारख्या खास प्रसंगात विराटच्या चाहत्यांनी सुद्धा रोहितला बर्थ डे विश केलं. आपलं प्रेम आणि आदराची भावना व्यक्त केली.
धोनीनंतर रोहित यशस्वी कॅप्टन
रोहित शर्माने 10 वर्षांपूर्वी रिकी पॉन्टिंगकडून मुंबई इंडियन्सच नेतृत्व हाती घेतलं होतं. आयपीएल 2013 च्या सीजनची मुंबईसाठी निराशाजनक सुरुवात झाली होती. रोहितने धुरा हाती घेतल्यानंतर चित्र बदललं. मुंबई इंडियन्सने त्यावर्षी आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली.
त्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएलची आणखी चार विजेतेपद मिळवली. आयपीएल इतिहासातील मुंबई इंडियन्स आज एक यशस्वी संघ आहे. सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनीनंतर आज रोहित शर्माच कॅप्टन म्हणून विनिंग पर्सेंटेज जास्त आहे.