AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit sharma IPL 2023 : Mumbai Indians कशी जिंकणार? फक्त एकदा रोहितच्या Average वर मारा नजर

Rohit sharma IPL 2023 : रोहित शर्माच्या आयपीएल करियरबद्दल बोलायच झाल्यास तो आतापर्यंत 234 सामने खेळलाय. यात 6060 धावा केल्यात. रोहितचा सर्वाधिक स्कोर 109 आहे.

Rohit sharma IPL 2023 : Mumbai Indians कशी जिंकणार? फक्त एकदा रोहितच्या Average वर मारा नजर
| Updated on: Apr 28, 2023 | 3:55 PM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्स आयपीएलमधील एक यशस्वी टीम असून त्यांचा कॅप्टन आहे रोहित शर्मा. रोहितच्या नेतृत्वाखाली पाचवेळा मुंबई इंडियन्सने आयपीएलच विजेतेपद मिळवलय. यंदाच्या सीजनमध्ये रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स दोघेही संघर्ष करताना दिसतायत. रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाहीय. त्यामुळे तमाम क्रिकेट पंडित रोहित शर्माची बॅट कधी तळपणार? असा प्रश्न विचारतायत.

काहींनी रोहित शर्माच करियर आता उतरणीला लागलय. त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असं आधीच ठरवून टाकलय. रोहित शर्माचा Average ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. मागच्या 6 आयपीएल सीजनपासून रोहित शर्माचा Average हा 30 च्या खाली आहे.

या सीजनमध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोर काय?

रोहित शर्माचा Average खाली असला, तरी त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा विजेतेपद मिळवलय. रोहित शर्माने चालू सीजनमध्ये 7 सामन्यात 181 धावा केल्यात. त्याचा Average 25.86 चा आहे. रोहितचा सर्वाधिक स्कोर 65 आहे. 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. दिल्ली या सीजनमधील सर्वात कमकुवत संघ आहे.

रोहितने सर्वाधिक धावा कुठल्या सीजनमध्ये केल्या?

रोहित शर्माच्या आयपीएल करियरबद्दल बोलायच झाल्यास तो आतापर्यंत 234 सामने खेळलाय. यात 6060 धावा केल्यात. रोहितचा सर्वाधिक स्कोर 109 आहे. त्याचा Average 30.15 आहे. या संपूर्ण करियरमध्ये ही सरासरी मेंटेन केलीय. थोडं मागे जाऊया. 2016 च्या सीजनमध्ये रोहितने 14 सामन्यात 489 धावा केल्या. रोहितचा बॅटिंग Average 44.45 चा आहे. रोहितच्या आयपीएल करियरमधील सर्व सीजनमधील हा जास्त Average आहे.

वर्ष सामने धावा सरासरी
20171733323.78
20181428623.83
20191540528.92
20201233227.66
20211338129.30
20221426819.14
रोहितने किती सरासरी मेंटेन केलीय? 2016 च्या आधी 2009 आणि 2010 मध्ये रोहित शर्माचा Average 30 च्या खाली आहे. ही दोन वर्ष सोडल्यास प्रत्येकवर्षी 30 पर्यंत त्याची सरासरी राहिलीय. रोहितच्या नेतृत्वाखाली IPL 2023 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने पहिले दोन सामने गमावले. त्यानंतर सलग तीन सामने जिंकेल. नंतर पुन्हा दोन सामने गमावले. पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स सातव्या नंबरवर आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...