रोहित शर्माला घाबरला ‘हा’ पाकिस्‍तानी गोलंदाज, म्हणतो त्याच्यासारखे शॉट्स तोच खेळू शकतो

| Updated on: Jun 07, 2021 | 1:47 PM

पाकिस्‍तानचा एक महत्त्वाचा गोलंदाज असणाऱ्या याच खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय फलंदाजाना सळो की पळो केलं होत. मात्र तो रोहित शर्माविरोधात गोलंदाजी करायला घाबरतो.

रोहित शर्माला घाबरला हा पाकिस्‍तानी गोलंदाज, म्हणतो त्याच्यासारखे शॉट्स तोच खेळू शकतो
Rohit Sharma
Follow us on

मुंबई : भारतीय संघाचा (Team India) सलामीवीर रोहित शर्माचे (Rohit Sharma) जगभरात लाखो चाहते आहेत. त्याची फलंदाजीच अशी आहे की, प्रेक्षकांसह कितीतरी खेळाडूंना त्याला बॅटिंग करताना पाहायला आवडतं. तर बरेच गोलंदाज त्याला बोलिंग करायला घाबरतात यातीलच एक नाव आहे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali). 26 वर्षीय हसनने नुकत्याच एका मुलाखतीत रोहितचं कौतुक करत त्याला बोलिंग करताना भिती वाटते असा खुलासाही केला आहे. ( Rohit Sharmas Cricket Shot only he can play says Pakistani Cricketer Hasan Ali)

भारत आणि पाकिस्तानचं क्रिकेटमधील युद्ध जगजाहीर आहे. दोन्ही संघात उत्तम खेळाडू असल्याने सामनेही तितकेच चूरशीचे होतात. अशाच 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनच्या चुरशीच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. ज्यात पाकिस्तानच्या हसन अलीने भारतीय फलंदाजाची धांदल उडवली होती. याच हसनला क्रिकविकला दिलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. कोणता असा फलंदाज आहे जो तुला चूरशीची टक्कर देऊ शकतो? यावर उत्तर देताना हसन म्हणाला, ”मी सर्व आकलन केल्यानंतर अनेक दिग्गज फलंदाजाना बोलिंग केल्यानंतर जो फलंदाज माझ्यासाठी चिंतेच कारण आहे तो म्हणजे रोहित शर्मा. मला सर्वात आधी आशिया कपमध्ये आणि नंतर वर्ल्‍ड कपमध्ये ही गोष्ट जाणवली. रोहित मैदानात कोणत्याही दिशेला शॉट खेळू शकतो. त्याच्यासारखे शॉट इतर कोणताच फलंदाज खेळू शकत नाही.”

पाकिस्तानविरोधात हिटमॅनचा ‘हिट’ रेकॉर्ड

हसन अली म्हणाला, ”चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी रोहित शर्माला बोलिंग करण्याची संधी मला मिळाली नाही. असं झालं असता तर रोहितने मला बरेच रन ठोकले असते.” रोहितने हसन अली विरोधात 87 चेंडूत 95 रन केले असून त्याचा स्ट्राइक रेट 109 चा राहिला आहे. संपूर्ण पाकिस्तान संघाविरोधात रोहितचा रेकॉर्ड धडाकेबाज असून मागील दोन महत्त्वाच्या सामन्यात रोहितने पाकिस्तान विरोधात शतक ठोकले आहेत. आधी 2018 मध्ये आशिया कप आणि नंतर 2019 च्या विश्वचषकात रोहितने हे शतक ठोकले आहेत.

हे ही वाचा –

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

(Rohit Sharmas Cricket Shot only he can play says Pakistani Cricketer Hasan Ali)